*समाजाने 'स्त्रीत्वाचा स्वीकार'या संकल्पनेची कास धरावी*

*समाजाने 'स्त्रीत्वाचा स्वीकार'या संकल्पनेची कास धरावी*

(मीडिया पोलिस टाईम अकोला जिला संपादक इमरान खान)

अकोला:आज समाजात सर्व स्तरावर तरुण महिलावर वाढत असलेल्या विविध दबावांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि संतुलनासह स्त्रीत्व समजून घेण्याची व ते स्वीकारण्याची घरी गरज आहे. स्त्री ही खऱ्या अर्थाने ताठ मानेने जगून तिने तिचे स्त्रीत्व जपले पाहिजे.म्हणून या संकल्पनेचा समाजाने स्वीकार करून स्त्रीत्वाला सन्मान द्यावा असे आवाहन गर्ल इस्लामिक ऑर्ग.च्या वतीने करण्यात आले. नवयुवती व विद्यार्थिनींच्या विकास संदर्भात विविध उपक्रम राबविणाऱ्या गर्ल इस्लामिक ऑर्ग.च्या वतीने 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रीय स्तरावर 'स्त्रीत्व स्वीकार'हे अभियान राबविण्यात येत आहे.गर्ल इस्लामिक ऑर्ग.च्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत या विषयाची माहिती देण्यात आली. यावेळी शाखा अध्यक्ष कु. आसेमा शेख,ऑर्ग च्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या कु अयमान  शादाब, महाराष्ट्र उत्तर दोनच्या कॅम्पस सचिव
सफिया शेख,माध्यम सचिव मोनिसा शेख, जमात ए इस्लामी हिंदच्या महिला शाखा अध्यक्ष सरवत सलमा सहाबा, मोहीम समनव्यक फायका समिन आदी नवयुवती पदाधिकारी उपस्थित होत्या. इब्रासिंग  फेमिनिटी अर्थात स्त्रीत्वाचा स्वीकार या संकल्पनेच्या संदर्भात जीआयओ चे देशव्यापी अभियान सुरू असून हे अभियान प्रवृत्ती या संकल्पनेतून प्रेरणा देते. प्रत्येक मनुष्य ज्या नैसर्गिक उपजत स्वभावासह निर्माण केला गेला आहे, तो एका बाजूला असलेल्या सांस्कृतिक बंधने आणि दुसरा बाजूला सतत कार्यक्षम राहण्याचा दबाव व भावनिक अलिप्तता या दोन्ही टोकांच्या पलीकडे हे अभियान तिसरी जागा अर्थात तिसरा मार्ग मांडत आहे.स्त्रीत्व ही कमजोरी किंवा मर्यादा नसून मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू असल्याचे या अभियानात मांडण्यात येत आहे. तसेच महिलांचा समाजातील प्रत्येक क्षेत्रातील सहभाग हा केवळ न्यायाचा विषय नाही तर महिला आपल्या स्त्रीतवाला दडपून न ठेवता योगदान देतात,तेव्हा संपूर्ण समाज अधिक समृद्ध होतो.या अभियानात नवयुवतींना स्त्रीत्व याचा अर्थ सांगण्यात येणार असून महिलांच्या वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्याला अधोरेखीत करणे,जीवनातील प्रत्येक क्षेत्रात समाजामध्ये त्यांचे सन्माननीय व प्रतिष्ठित स्थान स्पष्ट करणे, स्त्रियांना पाश्चात्य उदारमतवादी विचारसरणी तसेच अंतर्गत पितृसत्ताक विचारसरणी या दोन्हींचा विचारपूर्वक सामना करण्यास सक्षम बनवणे,दोन्ही टोकांच्या पलीकडे तिसरा मार्ग निर्माण करणे, तसेच भावनिक बळकटी, सामूहिक उपचार आणि सामूहिक विकासाला प्रोत्साहन देणारे सहाय्यक नेटवर्क आणि संसाधन केंद्र निर्माण करणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महानगरात ही या संघटनच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन होत असून या रचनात्मक उपक्रमात महिला, मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेत गर्ल इस्लामिक ऑर्ग.व जमात ए इस्लामी हिंदचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post