स्वयंसेवकांच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र उभारणे हे संघाचे ध्येय : सचिन कोंडेकर यांचे प्रतिपादन. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी).विजयादशमी निमित्ताने सेलूत पथसंचलन.सेलू : दि.06 ऑक्टो. राष्ट्रउन्नती साठी समाज संघटित करणे व स्वयंसेवकांच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र उभारणे हे संघाचे ध्येय आहे. संघाचे शताब्दी वर्ष हे केवळ उत्सवाचा क्षण नाही हे समाज नूतनीकरणाचे आवाहन आहे, असे प्रतिपादन देवगिरी प्रांत कार्यालयप्रमुख सचिन कोंडेकर यांनी केले. विजया दशमीच्या पावन पर्वावर संघाची स्थापना झाली.त्या अनुषंगाने सेलू तालुक्याचा विजयादशमी उत्सव 5 रविवार 5 ऑक्टोंबर रोजी श्री. केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला होता. उत्सवा साठी प्रमुख अतिथी डॉ. सतीश लिपणे, तालुका कार्यवाह विकास पिंगळे यांची उपस्थिती होती.सचिन कोंडेकर पुढे म्हणाले की, सेवा, सुसंवाद व शाश्‍वततेसाठी आपल्या सामूहिक वचनबद्धतेचे नूतनीकरणाचे आवाहन करण्यात आले. हिंदुसंस्कृती प्रदीर्घ काळापासून विश्‍वशांती व समाज कल्याणाचे कार्य करते, त्या संस्कृतीचे सांप्रत दर्शन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. स्वदेशी, कुटुंबप्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता या पंचसूत्रीचा विचार त्यांनी प्रतिपादीत केला.दरम्यान, सेलू शहरातून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, संघ गणवेशात स्वयंसेवक पंथसंचलनात सहभागी झाले होते. जागोजागी संचलनाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

स्वयंसेवकांच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र उभारणे हे संघाचे ध्येय : सचिन कोंडेकर यांचे प्रतिपादन.                         
Previous Post Next Post