सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दि.06 सेलू नगरपालिके च्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनूसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे.सोमवार 6 ऑक्टोंबर रोजी राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या निश्‍चिततेकरीता मुंबईत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सोडत आयोजित करण्यात आली. यामध्ये सेलू नगरपालिके च्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत झाले. सेलू पालिकेत एकूण 13 प्रभागातून दोन म्हणजे 26 नगरसेवक तर एक नगराध्यक्ष निवडूण द्यावा लागणार आहे. शहरात एकूण 13 प्रभागामध्ये 46 हजार 915 मतदार आहेत. तर अनूसुचित जाती 4 हजार 564 मतदार तर अनूसूचीत जमाती 1 हजार 77 मतदार आहेत.तर सर्वात जास्त मतदार मूस्लीम समाजातील असल्याने नगराध्यक्ष निवडी साठी हे मतदार निर्णायक ठरणार आहेत.दरम्यान पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी मागील काही दिवसापासून पालिकेची सूत्रे हाती घेतल्यामूळे नागरीकांच्या समस्यांचा निपटारा होत आहे. तर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची ही शहरावर पकड असल्याने ते सर्वच समाजातील मतदारापर्यंत छाप पडलेली आहे. तर नगराध्यक्षपद अनू सूचित जातीसाठी आरक्षीत झाले असल्याने भाजपाकडून माजी शहराध्यक्ष अशोक अंभोरे, विनोद बोराडे मित्रमंडळाकडून मिलिंद सावंत, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. विष्णू ढोले, अशोक उफाडे, दिपक चव्हाण, सूबोध काकडे, गौतम साळवे, अशोक पाईकराव, सतिश जाधव, गौतम धापसे, गौतम कनकूटे, संजय भाग्यवंत, विकास धापसे आदींच्या नावांची चर्चा सूरू आहे.दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून पालिकेत प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्य शासनाने निवडणूक घेण्याचे टाळून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. सोमवारी सेलू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनूसुचीत जाती प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. यामुळे मागील अनेक दिवसा पासून गुडघ्याला बांशीग बांधून असलेल्या सर्वच राजकीय पक्षातील इच्छूकांचा हिरमोड झाला आहे.

सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव.                                                                                     
Previous Post Next Post