*धनगर समाजाचा संताप उफाळला, एसटी आरक्षणासाठी धर्माबाद येथे मोर्चा व रास्ता रोको आंदोलन*. (*धर्माबाद प्रतिनिधी : गजानन वाघमारे )धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाच्या जमातीला लागू असलेले आरक्षण संदर्भात अंमलबजावणी करावी. तसेच घटनेत असलेले एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे यासाठी जालना येथे 14 दिवसापासून उपोषण करीत असलेले दीपक बोऱ्हाडे यांना पाठींबा देण्यासाठी व त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी धर्माबाद तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून ते रेल्वे गेट नंबर दोन पर्यंत च्या मुख्य रस्त्याने मोर्चा काढून त्या रास्ता रोको करत ठिय्या मांडला.रेल्वे गेट नंबर दोन या ठिकाणी जवळपास अर्धा तास रस्ता रोको करून प्रशासनाला जागे करून दिले आणि आमची आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास यापेक्षाही मोठे मोर्चे काढू असा इशाराही देण्यात आला.धनगर समाजाला तात्काळ एस.टी. प्रवर्गातील आरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. २ दिवसांत दिपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा दिपक बोऱ्हाडे सांगतील त्या पद्धतीने राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. यानंतर धर्माबाद तहसील कार्यालयाचे लायब तहसीलदार श्री गावंडे सर यांना निवेदन देऊन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले.यावेळी समाज बांधवांच्या वतीने यळकोट येळकोट 'जय मल्हार , धनगर एस.टी आरक्षण अंबलबजावणी झालीच पाहिजे , धनगर एकजुटीचा' विजय असो, अशा घोषणा देत आहेत. धर्माबाद येथील शेकडो धनगर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे.यावेळी याबाबत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भडीकर साहेब यांनी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवले होते.
byMEDIA POLICE TIME
-
0