हिप्परगा थडी येथे डॉ आण्णा भाऊ साठे, वाचनालयास प्रा. रामचंद्र भरांडे यांची भेट. (मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड)नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अभिमानी उपक्रम राबवलेल्या गावाला हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयास, प्रा. रामचंद्र भरांडे साहेब यांनी,आज भेट दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती, हिप्परगा थडी चे रहिवासी व परभणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, अनिल सायबु अंजनीकर, व माजी लोकस्वराज्य आंदोलन तालुका अध्यक्ष गंगाधर भंडारे,माधव गायकवाड, व यावेळी प्रा.रामचंद्र भराडे यांनी, मातंग समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोळ्यापुढे ठेवून, या अभ्यासिकेमध्ये व वाचनालयात ज्ञानी विद्यार्थी घडवावं, मोठे अधिकारी निर्माण होतील, डीजे मुक्त जयंती साजरी करून त्याच पैशातून, डॉ.अण्णाभाऊ साठे अभ्यासिका निर्माण केला त्याबद्दल, सर्व मातंग समाजाचे पुष्प वृष्टी, करून अभिनंदन व कौतुक केले. यावेळी हिप्पारगा थडी येथील, मातंग समाजातील महिला भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. व सर्व विद्यार्थी व मातंग समाजाचे समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,वाचनालयाचे अध्यक्ष मारोती एडकेवार,ग्रंथपाल राजू अंजनीकर,सुनील अंजनीकर,वाचनालयाचे सचिव राजू अंजनीकर,साहेबराव एडकेवार,बालाजी एडकेवार,बालाजी लघुळकर,राजू एडकेवार, भूमाजी अंजनीकर, संभाजी एडकेवार,उमाकांत एडकेवार,धोंडीबा अंजनीकर, धनबा आंजनिकर,बजरंग गायकवाड,अजय एडकेवार,अविनाश अंजनीकर, व सर्व मातंग समाजातील युवा तरुण कार्यकर्ते,समाजसेवक उपस्थित होते. गंगाधर भंडारे यांनी मार्गदर्शन केले, व वाचनालय समिती अध्यक्ष, मारोती एडकेवार यांनी आभार मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0