पंचनाम्यासाठी शेतकऱ्याचे तहसीलदार यांच्या पायाशी लोटांगण. सिल्लोड तालुका शासन प्रशासन यांच्या निष्क्रियतेमुळे, शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात ,तीन एकर शेतातील मकाचे पीक, शेतातील माती सह पुराच्या पाण्याने वाहून गेले ,तरी देखील आमसरी येथील शेतकऱ्याच्या शेतात शासनाचे अधिकारी पंचनामे करायला तयार नाही, सिल्लोड तालुक्यातील आमसरी गावातील शिवाजी बावस्कर यांच्या शेतात , 15 ते 20 दिवसापूर्वी पुराचे पाणी घुसून, शेतातील मका पीक ,शेतातील माती सह वाहून गेले , शिवाजी बावस्कर राहणार अमसरी सिल्लोड तालुका तहसीलदार यांना ,अनेक वेळा ,विनंतीपूर्वक सांगितले की, माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झालेले आहे , व शेतातील माती ही वाहून गेलेली आहे , तरी आपण माझ्या शेतातील नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामे करावे , तरी देखील शासकीय कर्मचारी यांनी या शेतकऱ्याच्या नुकसानी कडे दुर्लक्ष करून, शेतकऱ्यांचे नुकसान करून , कायद्याचे व शेतकऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन केलेले आहे, त्यामुळे शिवाजी बावस्कर या शेतकऱ्याने थेट तहसीलदार सिल्लोड यांच्या पुढे रडत आणि लोटांगण घेत ,आपली समस्या सांगितली. जर शेतकऱ्याला आपल्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्यावर सुद्धा पंचनामा करायला एवढी कसरत करावी लागत असेल तर, मात्र यावरून सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किती गांभीर्य आहे , हे या विषयावरून समजते, शासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान व शोषण होत आहे , मात्र शासन प्रशासन या विषयाकडे कानाडोळा करून, शेतकऱ्यांचे शोषण करीत आहे, यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन ,या शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यां वरती गुन्हे दाखल करायला हवे ,तरच शेतकऱ्याच्या समस्या सुटतील , त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटना तयार करायला हवे , तरच शासकीय अधिकारी संघटनेला घाबरून कामे करतील, तरच शेतकऱ्याचा विकास होईल, पत्रकार अंबादास संतोष जाधव
byMEDIA POLICE TIME
-
0