मानवत शहरातील मोकाट कुत्र्यांसह जनावरांचा त्रास वाढला**नगर परिषद प्रशासनाचे सामान्य प्रश्नाकडे दूर्लक्ष*(नागरिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे. ). (*मानवत / अनिल चव्हाण*. —————————————लाखो रूपये नागरिकांच्या सुरक्षेतेवर नगर पालिका प्रशासन खर्च करीत असून मुख्य व्यापार पेठ हि आठवडी बाजार बनली आहे. मानवत शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरे व कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ, शाळा परिसर तसेच वर्दळीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही कुत्री व जनावरे फिरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होत असून, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याकडे मात्र मानवत नगर परिषदेचे दूर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकातून चिंता व्यक्त केल्या जात आहे.शहरात गेल्या काही दिवसांत शहरातील पाच जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली असून, त्यामुळे नागरिक भय भीत झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना व सकाळ-संध्याकाळी फेरफटका मारणाऱ्या वृद्धांना मोकाट जनावरे श्वापद यांचा जास्त त्रास होत आहे.यासंदर्भात सुज्ञ नागरिकांनी मानवत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पण अजून पर्यंत काहीच उपाय योजना करतांना नगर परिषद प्रशासन दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुज्ञ व जागृक नागरिक मोहम्मद मुस्ताक शगीर खान अब्दुल वहाब सेठ बेरवाले यांनी मानवत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नगरपरिषदेकडून पकड मोहीम, लसीकरण मोहीम यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रश्नावर तातडीने उपाययोजना न केल्यास आणखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.***
byMEDIA POLICE TIME
-
0