चोपडा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षितजिल्ह्यात कुठं काय आरक्षण सविस्तर वाचाऑक्टोबर ०९, २०२५चोपडा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित .. जिल्ह्यात कुठं काय आरक्षण सविस्तर वाचा ..! (चोपडा दि.९( संजीव शिरसाठ)राज्यभर आगामी निवडणुकांची तयारी जोरदार सुरू असून नगरपालिका प्रभाग आरक्षणानंतर आता पंचायत समिती सभापतींचे आरक्षण नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यात चोपडा तालुका पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीच्या वाट्याला आली आहे त्यामुळे आता सभापती पदाचा दावेदार मोहरा म्हणून कोण कोण रिंगणात उडी घेते त्यासाठी मोर्चे बांधणी व्हायला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता बळावली आहे. त्याचप्रमाणे भुसावळ पंचायत समिती सभापती अनुसूचित जमाती च्या वाट्याला आली आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.जळगावचे नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दि.९ऑक्टोंबर रोजी जळगाव जिल्हा नियोजन भवनात 15 तालुक्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. बैठकीस नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण सोडत प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितरीत्या पार पडली.दुसरीकडे जामनेर पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला सभापती तर चर्चेत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला असे आरक्षण निघाले आहे.तालुक्यातील तालुका निहाय पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे*पारोळा- अनुसूचित जाती महिलाबोदवड- अनुसूचित जमाती महिलाभुसावळ व चोपडा- अनुसूचित जमातीअमळनेर व एरंडोल नागरिकांचा मागास प्रवर्गरावेर व मुक्ताईनगर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाचाळीसगावसह जळगाव, जामनेर व धरणगाव-सर्वसाधारण महिलायावल, पाचोरा व भडगाव- सर्वसाधारण

चोपडा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षितजिल्ह्यात कुठं काय आरक्षण सविस्तर वाचाऑक्टोबर ०९, २०२५चोपडा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित .. जिल्ह्यात कुठं काय आरक्षण सविस्तर वाचा ..!                         
Previous Post Next Post