मा.आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांनी वगळण्यात आलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अतिवॄष्टी निधीसाठी केला पाठपुरावा ___________________________मंगरूळपीर--वाशिम जिल्हातील अतिवॄष्टीमुळे खरडून गेलेल्या व पूरामुळे नुकसान बाधित झालेल्या जमिनी मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव तालुके वगळण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मा.आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांनी मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई उपसचिव श्री सामंत साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता नुकसान ची सविस्तर माहिती दिली असता श्री सामंत साहेब यांनी राहिलेल्या संबंधित तालुक्यातील निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही दिली.तसेच मा.ना.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अति पाऊसमुळे महापुरामुळे अतिवॄष्टी आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणि तिव़ नाराजी व्यक्त करत आहेत.यामुळे आपण विशेष पॅकेज सवलीतून वगळण्यात आलेल्या मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यावर झालेल्या अन्यायाला योग्य तो न्याय द्यावा असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

मा.आमदार श्री श्यामभाऊ खोडे यांनी वगळण्यात आलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अतिवॄष्टी निधीसाठी केला पाठपुरावा 
Previous Post Next Post