*लोकशाही पत्रकार संघ समुद्रपूर यांचे मा. तहसीलदार साहेब तालुका समुद्रपूर मार्फत माननीय अध्यक्ष साहेब बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हायकोर्ट एक्टेन्शन फोर्ड बॉम्बे यांना निवेदन सादर**मा.भूषण गवई साहेब न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दिनांक 6/10/2025 रोजी आरोपी वकील राकेश किशोर याने न्यायालयीन कारवाई सुरू असताना त्यांचे वर पायातील बूट फेकून व संविधानिक कृत्य केले त्याचेवर देशद्रोहाचा B N S अन्वये गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी*लोकशाही पत्रकार संघ समुद्रपूर तालुका, जागरूक मानव समाज,बौद्ध बांधव यांचे वतीने जाहीर निषेध निवेदन सादर केले की दिनांक 6/10/2025 रोजी मान्यवर आयु. भूषण गवई साहेब न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे न्यायालयीन कारवाई सुरू असताना त्यांच्यावर सनातनी समर्थक राकेश किशोर याने पायातील बुट फेकून मारण्याचा असफल प्रयत्न केला हे कुकृत्य म्हणजे प्रत्यक्ष भारतीय लोकशाही न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर भ्याड हल्ला आहे ह्या मनुवादी कृत्याचा जाहीर निषेध करून आरोपीवर भारतीय न्यायसहिता अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार समुद्रपूर यांचे मार्फत करण्यात आली यावेळी लोकशाही पत्रकार संघ कार्यकारणी तसेच पत्रकार बंधू समुद्रपूर तालुक्यातील बौद्ध बांधव इत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
byMEDIA POLICE TIME
-
0