आदर्श शिक्षिका सौ. ज्योती नितीन शेलार यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी निवड!. (.पुणे जिल्हा बेल्हे प्रतिनिधी: संदीप शितोळे)महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ* या अंतर्गत सत्यशोधक समाज प्रत्येक वर्षी प्रोटॉन अधिवेशन 2025* हे घेत असते सदर अधिवेशन राज्यस्तरीय आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला कामातून निर्माण केलेला आदर्श शिक्षक.सावित्रीबाई च्या कल्पनेतील आदर्श शिक्षक कसा असावा याच्या आयामातील महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन आदर्श शिक्षक निवडले जातात व त्यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केले जाते.यावर्षी या पुरस्कारासाठी आपल्या केंद्रातील एक आदर्श शिक्षिका एक सामाजिक क्षेत्रातील अनेक उपेक्षित समाज घटक लोकांची माई, अनेक वंचित, बेवारस, निराधार अन मनोरुग्ण व्यक्तींना आधार देणारी आई ज्यांच्या कामाची ख्याती पूर्ण महाराष्ट्रात नावाजली गेली अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांना सन्मानित करण्यात आले अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोलवड च्या सन्माननीय उपशिक्षिका सौ ज्योती नितीन शेलार मॅडम यांना या वर्षाचा प्रोटॉन अधिवेशन 2025 अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सत्यशोधक गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.सदर पुरस्कार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या कामाच्या उत्तुंगपातळीची दखल व ओळख नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला होत असून अनेक स्तरावरून आपणास नावाजले जात आहे याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो.
byMEDIA POLICE TIME
-
0