पिस्तूलचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी भरत रावसाहेब चिंधे चा जामीन श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; BNS च्या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल

पिस्तूलचा धाक दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपी भरत रावसाहेब चिंधे चा जामीन श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; 
   BNS च्या गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल

(अहिल्यानगर। प्रशांत बाफना विभागीय संपादक)

नोकरीचे आमिष दाखवून आणि पिस्तूलचा धाक दाखवून एका तरुणीवर वारंवार अत्याचार व लैंगिक शोषण करणाऱ्या भामट्याचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. भरत रावसाहेब चिंधे (रा. वडगाव तानपुरा, कर्जत) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ (BNS) अंतर्गत अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने त्याला जामीन नाकारला.
            आरोपीवर दाखल झालेली कायदेशीर कलमे:
कर्जत पोलीस ठाणे (गुन्हा रजि. नं. ४०३/२०२६) आरोपीविरुद्ध खालील गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
कलम ६४, ६४(१), ६४(२)(m) (BNS): पिस्तूलचा धाक दाखवून, भीती घालून वारंवार बलात्कार करणे व लैंगिक शोषण करणे.
कलम ३५२ (BNS): गुन्हेगारी बळाचा वापर करून शारीरिक हल्ला/मारहाण करणे.
कलम ३५१(२) (BNS): जीवे मारण्याची धमकी देऊन गुन्हेगारी धाकदपटशा करणे.
          घटनेची पार्श्वभूमी आणि आरोपीची कार्यपद्धती:
पीडित तरुणीच्या गरिबीचा व आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा आरोपी भरत चिंधे याने घेतला. तिला 'पोलिस मित्र' म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने जानेवारी २०२६ मध्ये तिला आपल्या घरी बोलावले. तेथे पिस्तुल दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.

न्यायालयाचे कडक ताशेरे:
आरोपीने नियमित जामिनासाठी श्रीगोंदा न्यायालयात (Criminal Bail M.A. No. 611/2026) अर्ज केला होता. आरोपीच्या बाजूने यु.एस. नेवसे यांनी बाजू मांडली. मात्र, पीडितेचे वकिल रवीना घोडके मॅडम आणि सरकारी वकील केसकर साहेब यांनी जामिनाला तीव्र विरोध केला. 
        आरोपीचा अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच गुन्हेगारी इतिहास (Criminal Antecedents) राहिला आहे. जामिनावर सुटल्यास आरोपी पीडिता आणि साक्षीदारांवर दबाव आणू शकतो व पुरावे नष्ट करू शकतो, ही बाब लक्षात घेऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. एच. साळुंके साहेब यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
           नागरिकांना सजग आणि सक्षम राहण्याचे आवाहन:
आरोपी भरत रावसाहेब चिंधे हा नोकरीचे आमिष दाखवून गरजवंत तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून समाजाने, विशेषतः तरुणींनी अत्यंत सावध व सजग राहण्याची गरज आहे.
           नोकरीचे अवाजवी आमिष: कोणत्याही संशयास्पद व्यक्तीच्या नोकरीच्या आश्वासनावर सहजासहजी विश्वास ठेवू नका.
तातडीने तक्रार करा: असा कोणताही गैरप्रकार किंवा धाकदपटशा घडल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा '१०९१' या महिला हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवा.

          एकत्रित लढा: अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा बुरखा फाडण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकत्रितपणे सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे.
               - प्रदिप राजु हिवाळे 
    ( संस्थापक अध्यक्ष - प्रिषा फाउंडेशन सलग्न पोलीस मित्र समिती, महाराष्ट्र राज्य
Previous Post Next Post