जागतिक कापूस दिवसानिमित्त कापूस पिकावर फुड्स स्प्रे चे प्रात्यक्षिक ( वर्धा विभागीय संपादक अब्दुलकदीर )हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथे स्पेक्ट्रम फाउंडेशन च्या वतीने दिनांक 7/10/2025 रोजी हडस्ती येथील शेतकरी योगेश राजूरकर यांच्या शेतामध्ये अतिघन लागवड (HDPS ) डेमो प्लॉटवर शेतकऱ्यांना बोलावून जागतिक कापूस दिवस उत्साहात साजरा करण्यात आला,मित्र कीड आणि शत्रू किडींची ओळख करून देण्यात आली . प्रमुख किडीचे उत्तम व्यवस्थापन कसे करता येईल हे केलेल्या फुड्स स्प्रे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजावून सांगितले हानिकारक औषधांचा ( कीटकनाशकांचा) वापर कमी करणे कीड दिसताच फवारणी न करणे, पिकाची पाहणी करूनच फवारणी करणे ( आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तरच ) फवारणी करतेवेळी वैयक्तिक सुरक्षात्मक साधनांचा वापर करणे अशा पद्धतीने ॲग्री एक्सटेंशन सर्विसेस चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मोहन बर्डे, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील कीटक शास्त्रज्ञ निखिल वजीरे यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्र प्रवर्तक वैभव पोहनकर यांनी केले तर प्रास्ताविक क्षेत्र प्रवर्तक अजय मांडवकर यांनी केले, तज्ञांनी मार्गदर्शन केले या प्रात्यक्षिकाला प्राप्त जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांसोबत स्पेक्ट्रम फाउंडेशन अंतर्गत उत्तम कापूस निर्मिती उपक्रम सहभागी होऊन जागतिक कापूस दिवस साजरा केला. या कार्यक्रमात गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते तसेच स्पेक्ट्रम फाउंडेशन चे पियू व्यवस्थापिका रेणुका फरकाडे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पडला क्षेत्र प्रवर्तक पंकज दोडके दिगंबर सेलकर शितल बोरकर राहुल मिलमिले कुंदन कोडापे विकी धानोरकर राहुल कहूर्के हर्षल साठोणे शारदा ढोके उपस्थित होते.यादरम्यान सास्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देण्यात आली . विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला रॅली काढण्यात आली.
byMEDIA POLICE TIME
-
0