एसबीआय बॅके तर्फे विद्यार्थ्यांना पासबूकसह स्कूल बॅगचे वाटप* ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.9:- एसबीआय बँके तर्फे विद्यार्थ्यांना पासबुकसह स्कूल बॅग वाटप, विद्यार्थ्यांना बँकिंग सेवेचा अनुभव" भद्रावती शहरातील स्थानिक लोकमान्य विद्यालयात दिनांक 6 ऑक्टोंबर 2025 रोज सोमवारला सकाळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भद्रावतीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या संचालिका सौ सारिका संदीप इंगळे यांच्या पुढाकाराने व बँक व्यवस्थापक श्री धीरज येवले, बँकेचे सहाय्यक अधिकारी श्री फुलझले यांच्या मार्गदर्शनात झिरो बँक बॅलेन्स खाते आधारित शिबिर राबविण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर योजनेसाठी झिरो बॅलेन्स बँक खाते उघडून देण्यात आले यामुळे बँकिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर झाल्या व विद्यार्थ्यांनी बँकिंग सेवेचा अनुभव घेतला तसेच या शिबिरात विद्यार्थ्यांना बँक खात्यासोबत स्कूल बॅगचे सुद्धा वितरण करण्यात आले याप्रसंगी लोकमान्य विद्यालयाची अध्यक्ष श्री चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य श्री धारणे सर, विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वृंद व संदीप इंगळे उपस्थित होते.

एसबीआय बॅके तर्फे विद्यार्थ्यांना पासबूकसह स्कूल बॅगचे वाटप*                                                                                         
Previous Post Next Post