शिक्षणातून स्वतःच्या विकासासोबत समाजाचा विकास साधा -सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मानव संसाधन विकास विभाग व नूतन शिक्षण मंडळ,घोडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींना १२५ सायकलींचे वाटप.. चोपडा (संजीव शिरसाठ ) घोडगाव– येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित सी.बी.निकुंभ माध्य. उच्च माध्य. विद्यालयात ना. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पात्र विद्यार्थिनींना १२५ सायकलींचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी माजी विधानसभा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य,आमदार अनिल भाईदास पाटील विधानसभा मतदार संघ अमळनेर,शाळेचे माजी विद्यार्थी वउद्योजक प्रकाश बाविस्कर नवी मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,वसंत पाटील,शिक्षक नेते संभाजी पाटील,सोनमताई पाटील अध्यक्ष, ज.जि. मा.माध्यमिक पतपेढी जळगाव, चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माधुरी मयूर, माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, चोपडा पीपल्स बँकेचे संचालक मंडळ सदस्य,संस्थेचेउपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, रमाकांत सोनार, मदन पाटील, कांतीलाल पाटील, निंबा पाटील तसेच घोडगाव व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी,सरपंच उपस्थित होते.मानव विकास विभागांतर्गत पंचायत समिती, शिक्षण विभाग, चोपडा यांच्या वतीने ८८ सायकल व नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, पालक शिक्षक संघ यांच्याकडून ३७ सायकलींचे पात्र विद्यार्थिनींना घर ते शाळा ये- जा करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. याप्रसंगी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र १८ विद्यार्थी तसेच एन. एम. एम. एस. परीक्षेतील पात्र ४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आय.सी.आय. सी.आय.बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विमा पॉलिसी अंतर्गत चार विद्यार्थ्यांना वैद्यकीय खर्चाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या इयत्ता ७ वी च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाले. यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी यांनी विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल आय.टी. आय या शाखांची शैक्षणिक प्रगती सांगितली. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षित होऊन स्वतः सोबत गावाचा विकास करावा व मोठ्यांचा मानसन्मान करावा याबद्दल सांगितले, ग्रामीण भागातील विद्यालय असून देखील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते तसेच विविध शैक्षणिक योजना राबविल्या जातात याबद्दल कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए. पाठक, प्रा.समाधान बि-हाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी मुख्याध्यापक आर.एम.चौधरी, पर्यवेक्षक व्ही.पी.पाटील, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य जेनिफर साळुंके, आय. टी. आय. चे प्राचार्य अविनाश सूर्यवंशी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल परिसरातील पालकांनी कौतुक केले.
byMEDIA POLICE TIME
-
0