शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न... (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅट वर ग्रामीण खेळाडूंनी घेतला आनंद.सेलू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, नूतन विद्यालय सेलू वतीने शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा दि. 8/10/2025 (बुधवार) रोजी सकाळी : 11 30 वा.नूतन इनडोअर क्रीडा हॉल सेलू संस्था सचिव डॉ व्हि.के.कोठेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रथमच मातीवर खेळणारा कबड्डी क्रीडा स्पर्धा मॅटवर घेण्या त आल्या. ग्रामीण भागातील खेळाडूंनी आनंद घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया ,संजय मुंढे ( राज्य क्रीडा मार्गदर्शक परभणी),डी.डी.सोन्नेकर (जिल्हा सचिव योगासन असो)गणेश माळवे (जिल्हा सचिव परभणी जिल्हा टे.टे. असो, प्रशांत नाईक(तालुका क्रीडा संयोजक),पी.आर. जाधव (जिल्हा अध्यक्ष शिक्षक संघटना), माधव शिंदे, ज्ञानेश्वर गिरी,भारत धनले, तुकाराम शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.सदरील स्पर्धेत 14/ 17/19 वर्षे मुले व मुली परभणी जिल्ह्यातील 54 संघातील 630 खेळाडू सहभागी झाले होते‌. शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे: १४ वर्षे मुली गटात प्रथम: पाथरी तालुका, व्दितीय: सेलू तालुका.१७ वर्षे मुली गटात प्रथम: गंगाखेड तालुका, व्दितीय: जिंतूर तालुका. १९ वर्षे मुली गटात प्रथम सेलू तालुका, व्दितीय: गंगाखेड तालुका.१९ वर्षे मुले गटात नूतन महाविद्यालय सेलू तालुका,व्दितीय: गंगाखेड तालु का, १७ वर्षे मुले गटात: गंगाखेड तालुका, व्दितीय सेलू तालुका.बक्षीस वितरण सोहळ्यात माजी सभापती कृ.ऊ.बा. दिनकर वाघ, जयप्रकाशजी बिहाणी,संजय मुंढे, कैलास काळे, गुलाब रोडगे, गणेश माळवे,किशन भिसे, कार्यक्रम सुञसंचलन प्रशांत नाईक तर आभारप्रदर्शन किशोर ढोके यांनी केले.स्पर्धेत पंच म्हणून डॉ.खाजा अ. खदिर, योगेश जोशी,शेख कलिम, राहुल अंबेगावकर, गोपाळ गावंडे, अर्जुन भिसे, धिरज नाईकवाडे, आदींनी काम केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी संजय भुमकर, राजेश राठोड, किशोर ढोके, राहुल घांडगे, प्रा. सत्यम बुरकुले,कुणाला चव्हाण, सुरज शिंदे, अनुराग आंबटी, समाधान मस्के, विशाल ढवळे परीश्रम घेतले.

शालेय जिल्हा कबड्डी क्रीडा स्पर्धा संपन्न...                                       
Previous Post Next Post