शहादा तालुक्यात सराफा व्यापाऱ्याचे सुमारे दहा किलो चांदीसह अपहरण; बंदुकीचा वापर, चोरट्यांचे पोलिसांना आव्हान. (प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी ) शहादा : येथील चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख हे म्हसावद ता. शहादा येथे आपल्या दुकानाकडे जात असतांना शहादा-म्हसावद रस्त्यावरील बुडीगव्हाण फाट्याजवळ वर्दळीच्या जागी चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवित त्यांचेकडील सोने-चादीचे दागिने लुटत श्री. पारेख यांचे देखील अपहरण केले आहे. या घटनेमुळे शहादा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबतचे वृत्त असे, रितेश जयप्रकाश पारेख हे नेहमी प्रमाणे शहाद्याहून म्हसावद येथे जात असतांना दुकानासाठी लागणारे सोने-चांदीचे दागिने घेवून सकाळी १० सव्वादहाच्या सुमारास शहादा-म्हसावद रस्त्यावरील बुडीगव्हाण फाट्याजवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना जबर मारहाण करीत गाडीच्या काचा फोडून बंदुकीचा धाक दाखवित त्यांच्या ताब्यातील सोने-चांदीच्या रकमांसह त्यांचे देखील अपहरण केले. अपहरणाच्या वेळी व्यापाऱ्याजवळ अंदाजे दहा ते वीस किलो चांदी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दिवसा ढवळ्या परिसरा धाडसी दरोडा टाकण्यात आला असून चोरट्यांचे धाडस पाहता ते मोठ्या पार्श्वभूमीचे गुन्हेगार असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हा फाटा शहादा-धडगाव या मुख्य रस्त्यावर म्हसावद गावाजवळ आहे. तेथे प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांची नेहमीच वर्दळ असते. शहादा पोलिसांना या घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक निलेश देसले, म्हसावद पोलिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून परिसरातील रस्त्यांची नाकेबंदी केली. मात्र चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. घटनास्थळी फॉरेंसीक तपास पथक देखील आले होते. काही पुरावे मिळतात का? याचा शोध घेतला जात असून पोलिसांनी चौकशीसाठी पथके नेमल्याचे वृत्त आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज व वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्हा पोलिसांची सुद्धा मदत घेतली जात आहे. या घटनेत आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान गत दोन वर्षापूर्वी देखील अशीच लुटमारीची घटना घडली होती. त्याचा तपास अद्याप सुरु आहे. वाढत्या दरोडाच्या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांवर नियंत्रण आणावे. तसेच सराफा व्यापाऱ्याच्या शोधासह चोरट्यांचा चोख बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात येत आहे.

शहादा तालुक्यात सराफा व्यापाऱ्याचे सुमारे दहा किलो चांदीसह अपहरण; बंदुकीचा वापर, चोरट्यांचे पोलिसांना आव्हान.                                                                              
Previous Post Next Post