मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेवुन रस्तालुटीसाठी थांबलेले ०७ आरोपी चोपडा शहर पोलीस स्टेशनकडुन जेरबंद. . . . . . . . . . . . . . . . (चोपडा विभागीय उपसंपादक संजीव शिरसाठ). चोपडा दि . २७ / १० / २०२५ रोजी शहरामध्ये मध्यरात्री शिरपुर बायपास रोडवर एका पांढ-या रंगाच्या गाडीमध्ये संशयीत इसम बराच वेळ थांबलेले असल्याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांना दिनांक २७/१०/२०२५ रोजी मध्यरात्री ०२-३० वा चे सुमारास गोपनीय बातमी मिळाली होती. त्याअनुषंगाने तात्काळ पोलीस पथक तयार करून संशयीत गाडीचा शोध घेतला असता रणगाडा चौकाच्या थोडे पुढे, शिरपुर बायपास रोडच्या बाजुला पांढ-या रंगाची स्विष्ट डिझायर चारचाकी कार क्र.MH २६ CH १७३३ ही थांबलेली, सदर गाडीच्या बाहेर दोघेजण लक्ष ठेवून उभे असलेले व पाच जण आतमध्ये बसलेले असे एकुण सात संशयीत इसम मिळुन आले. पोलीसांना पाहुन त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकाने तात्काळ घेराव घालुन सदरच्या सातही इसमांना पकडले. सदर इसमांची तसेच त्यांच्या मो. कारची झडती घेतली असता दोन इसमांच्या कंबरेला लोड करण्यात आलेले गावठी कट्टे मिळुन आले. त्याचप्रमाणे गाडीमध्ये दोन तलवारी तसेच एक रिकामे मॅगझीन मिळुन आली. सदर इसमांची नावे पुढिलप्रमाणे आहेत.१. दिलीपसिंघ हरीसिंघ पवार वय ३२ वर्ष रा. प्लाट नं. ४२१ नाथनगर, नांदेड ता.जि. नांदेड,२. विक्रम बाळासाहेब बोरगे वय २४ वर्षे रा. येवलारोड, विरभद्र मंदीरा जवळ वैजापुर ता. वैजापुर जि. संभाजीनगर३. अनिकेत बालाजी सुर्यवशी वय २५ वर्षे रा. नवामोंढा, गणेश मंदीर जवळ नांदेड ता.जि. नांदेड.४. अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड वय २५ वर्षे रा. मगनपुरा नांदेड ता.जि. नांदेड.५. सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन वय ३३ वर्षे रा. इतवारा मेस्को रोड, नांदेड ता.जि. नांदेड,६. अक्षय रविंद्र महाले वय ३० वर्षे रा. भावसार गल्ली चोपडा ता. चोपडा जि. जळगाव,७. जयेश राजेंद्र महाजन वय ३० वर्ष रा. भाटगल्ली चोपडा ता. चोपडा जि. जळगावसदर संशयीतांबाबत अधिक चौकशी केलो असता ते नामचीन गुन्हेगार असल्याचे व त्यांच्यावर यापूर्वीपुढिलप्रमाणे खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, अग्निशस्त्रे व तलवार, चॉपर बाळगणेयासारखे गंभीर गुन्हे नांदेड, वैजापुर जि संभाजीनगर, तसेच चोपडा येथे यापूर्वी दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.दिलीपसिंग हरीसिंघ पवार याचेवर दाखल गुन्हे-१) इतवारा पोलीस स्टेशन जि.नांदेड गु.र.नं. ४४६/२०२४ भा.न्या.सं. कलम १४०,११५ (२),३५१(३),३५२,३ (५) सहभा.ह.का. कलम ४/२५२) विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २३०/२०२० भा.द.वि. कलम ३०७,३२३,५०४,५०६३) नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ४२४/२०१२ भा.द.वि. कलम ३०२,२०१,१२०,३४ सह भा.ह.का. कलम ३/२५.४) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २१८/२००८ भा.द.वि. कलम ३०२,३०७,१२०(ब), विधीसंघर्षीत बालक५) वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. १४३/२०१७ भा.द.वि. कलम ११५,१२० (व) सह भा.ह. का. कलम ४/२५६) विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ३९/२०१५ भा.ह. का. कलम ३/२५,७/२५,४/२५.७) वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २२/२०१८ भा.द.वि. कलम २९४,५०४,३४ सह भा.ह. का. कलम ४/२५.विक्रम उर्फ विकी बाळासाहेव बोरगे याचेवर वैजापुर पोलीस स्टेशन संभाजीनगर गु.र.नं. ५०३/२०२५ भा.न्या.सं.कलम ३१० (४) सह भा. ह. का. कलम ३/२५ दाखल असुन सदर गुन्हयामध्ये तो फरार आहे.अनिकेत बालाजी सुर्यवंशी याचेवर दाखल गुन्हे-१) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं.१६०/२०२५ भा.न्या.सं. कलम ११८ (२),१९१(२), १९३ (३),१९०,३५२,३५१(२).२) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ६५४/२०२४ भा. न्या. सं. कलम १०९,११५ (२), ३५१ (३),१८९(२),१८९(४)१९०.3) शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं.५११/२०२४ भा.ह. का. कलम ३/२५.४) शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं.५०५/२०२४ भा.ह. का. कलम ४/२५.५) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ५५८/२०२४ भा.ह.का. कलम ३/२५.६) विमानतळ पोलीस स्टेशन नांदेडा, गु.र.नं. २६९/२०२३ भा.द.वि.कलम३०७,३२३,३३६,१४३,१४७,१४८,१४९,५०४, ५०६ भा.ह. का. कलम ४/२५.७) अर्धापुर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २५७/२०२३ भा.द.वि. कलम १४३,१४७,१४९,३०७,३९५,३२३,५४,५०६ भा.ह.का.कलम ४/२५.८) विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. १५२/२०२३ भा.ह.का. कलम ३/२५.९) मरखेल पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ९१/२०२३ भा.ह.का. कलम ३/२५.१०) शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ५०/२०२३ भा.ह.का. कलम ४/२५, मपोका कलम १३५.११) विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २८/२०२३ म.जु.का. १२ (अ).१२) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. ३४२/२०२२ भा.ह. का. कलम ४/२५.१३) भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २४२/२०२२ भा.द.वि. कलम ३८६,५०६,३४, भा.ह. का. कलम ४/२५.१४) शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड, गु.र.नं. २८८/२०२० भा.द.वि. ३९४,३९५ भा.ह.का. कलम ३/२५, ४/२५.अक्षय रविंद्र महाले याचेवर दाखल गुन्हे.१) चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२/२०१६ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,४३५,४३६,४२७,३२३, ३५३,३३२,३३३ वगैरे. ह्य२) चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७४/२०२१ भा.ह.का. ३/२५, ७/२५.३) चोपडा दारुबंदी विभाग गु.र.नं. २१/२०२५ दारुबंदी अधिनीयम कलम ६५(ई).४) चोपडा दारुबंदी विभाग गु.र.नं. ४०५/२०२५ दारुबंदी अधिनीयम कलम ६५(ई).सदरचे गुन्हेगार अतिशय धोकादायक असुन त्यापैकी दोन आरोपी हे महाराष्ट्र धोकादायक कृत्यांना प्रतिबंधअधिनियम (MPDA) कायद्यान्वयेच्या स्थानबध्दतेमधुन नुकतेच कारागृहातुन बाहेर आलेले आहेत. एक आरोपी वैजापुर,जि संभाजीनगर येथील दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आहे. चोपडा येथील एका आरोपीवर पुर्वीअग्निशस्त्र बाळगल्याबाबत तसेच दंगल केल्याबाबत गुन्हे नोंद आहेत. सदरचे सर्व ०७ आरोपी हे संगनमताने रस्तालुट वदरोड्याची तयारी करून सशस्त्र स्थितीत एकत्र जमल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरूध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनगु.र.नं ५८१/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१०(४),३१० (५), सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ४/२५ सहमहा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे नोंद करण्यात आला असुन आरोपीना अटककरण्यात आले आहे व त्यांच्याकडे मिळुन आलेले गावठी पिस्टल, तलवारी, मोबाईल फोन, रोख रक्कम, चारचाकीगाडी असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीतांना रिमांडकामीन्यायालयात हजर करण्यात येत आहे.आरोपीतांबाबत केलेल्या तपासामध्ये दिसुन आले आहे की, नांदेड येथे सदर आरोपीतांची अतिशय दहशत असुनलोकांना शस्त्रांचा धाक दाखवुन खंडणी वसुल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, विवस्त्र करून लोकांचा छळ करणे वत्याचे व्हिडीओ तयार करून ते इतर लोकांना दाखवुन त्यांना घाबरवणे असे कृत्ये करत असल्याचे दिसुन येत आहे.त्याबाबत सखोल तपास चालु आहे.सदरची कारवाई श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक,चाळीसगाव, श्री अण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीसनिरीक्षक श्री मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एकनाथ भिसे, पोहेकॉ/२८९६ हर्षल पाटील, पोहेकॉ/२०८६संतोष पारधी, पोहेकॉ/१८०५ ज्ञानेश्वर जवागे, पोकॉ/५०३ अमोल पवार, पोकॉ/३२३८ मदन पावरा, पोकों/७६८ रविंद्र मेढे, पोका २१माली, पोकों/२१४५ विनोद पाटील, चालक पोहेकॉ/२०१० किरण धनगर, पोको २१२५ योगेश पाटील, पोकॉ/१४४१ प्रकाश ठाकरे'यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करत आहेत.

मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेवुन रस्तालुटीसाठी थांबलेले ०७ आरोपी चोपडा शहर पोलीस स्टेशनकडुन जेरबंद. . . . . . . . . . . . . . . .                          
Previous Post Next Post