MPSC/UPSC अभ्यासिका दालनाचे उद्घाटन संपन्न . (फैजपूर प्रतिनिधी). सूर्यजीवनी बहुउद्देशीय संस्था जळगाव व झाल्टे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने MPSC/UPSC अभ्यासिका दालनाचे उद्घाटन आयु.संजय इंगळे प्रसिद्ध उद्दोजक यांचे हस्ते आज दिनांक 5/10/2025 रविवार रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुर्य जीवनी संस्थेचे अध्यक्ष आयु सुनिल जाधव हे होते. प्रारंभी आयु.संजय इंगळे साहेब यांचे स्वागत बुके देवून आयु.सुनिल जाधव यांनी केले.आयु.संजय इंगळे साहेब यांनी नवीन अभ्यासिका दालनाचे फित कापून उद्घाटन केले.त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अभ्यासिर्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.आयु.सुनिल जाधव साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव आयु हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन खजिनदार सुकदेव तायडे यांनी केले.कार्यक्रमाला सर्व संचालक आयु.मिलिंद सपकाळे साहेब,भीमराव अडकमोल,उमेश कांबळे व अजित भालेराव तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सुर्यजीवनी अभ्यासिका ही रामदास कॉलनी,झिनिया बिल्डिंग ,हॉटेल रॉयल पॅलेस च्या पश्चिमेस असून 108 विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसह सर्व सोई सुविधानी सुसज्ज अशी आहे. ओम राजपूत यांचे सहकार्य लाभले.

MPSC/UPSC अभ्यासिका दालनाचे उद्घाटन संपन्न
Previous Post Next Post