*सेवाभावी संस्था प्रबोधन समिती...नागपूर विभागाची,कार्यशाळा संपन्न* (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख ) समाजसेवेचा 32 वर्षांच्या अनुभवाची शिदोरी गाठीस बांधून, समाजसेवेचा वसा घेऊन, डॉ. सुनिताताई मोडक यांनी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना केल्यानंतर.... महाराष्ट्राच्या दौऱ्यातील पहिली नागपूर विभागाची (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया,भंडारा, गडचिरोली जिल्हे ) कार्यशाळा... *आज दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी, यशवंत महाविद्यालय,वर्धा येथे पार पडली.*यावेळी नागपूर विभागातील,सहा जिल्ह्यामधून शेकडो संस्था आणि संस्थाचालक उपस्थित होते...सकाळी पत्रकार परिषद झाल्यावर...सेवाभावी संस्थाकरिता आयोजित, कार्यशाळेमध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन झाले.*1) मोडकळीस आलेल्या संस्थाचे पुनर्वसन.**2) शासकीय योजनांचे पुनर्वसन.**3) शासकीय योजनाच्या सर्व कागदपत्राविषयी मार्गदर्शन.**4) सर्व सेवाभावी संस्थांची एकमेकांसोबत ओळख.**5) शासनाच्या उद्दिष्टानुसार निधी कसा मिळवायचा.**6) सेवाभावी संस्थांना विभागानुसार कपन्याचा csr निधी उपलब्ध होण्याकरिता मार्गदर्शन.*यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून *यशवंत महाविद्यालयचे संस्थाअध्यक्ष सन्मा. समीर देशमुख साहेब, *दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश सन्मा.विवेक देशमुख, वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष डॉ सचिन पावडे* उपस्थित होते.या कार्यशाळेला सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यअध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक, खजिनदार सन्मा. सतिश जगताप, राज्यसंपर्क प्रमुख सौ.निताताई पांगुळ, राज्य सदस्य संजय निर्मळ, प्रकोष्ठ समिती सचिव अनिता बोरस्ते, राज्य सहसचिव प्रताप पवार, राज्य सदस्य सुनिल फुलारी उपस्थित होते.*या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सौ. सुनिताताई मोडक, मा.सतिश जगताप, मा. संजय निर्मळ, मा.सुनिल फुलारी यांनी मार्गदर्शन केले.*यावेळी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून राष्ट्रपती पदक विजेती रश्मी वाळके ह्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्यअध्यक्षा डॉ. सौ. सुनिताताई मोडक यांनी नागपूर विभाग प्रकोष्ठ कार्यकारिणी जाहीर केली.सदर कार्यशाळेला उपस्थित नागपूर विभागातील सर्व विभाग कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी यांचे मन:पूर्वक आभार.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

सेवाभावी संस्था प्रबोधन समिती...नागपूर विभागाची,कार्यशाळा संपन्न*                                                     
Previous Post Next Post