मल्हार गरबा नाईटला उत्स्फूर्त प्रतिसाद; मान्यवरांचा सन्मान सोहळा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू .. (🌺.वर्धा (प्रतिनिधी): समर्थ बहुउद्देशीय संस्था, वर्धा यांच्या वतीने आयोजित मल्हार गरबा नाईट कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, बंजारी चौक येथे हा रंगतदार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अश्विनीताई काकडे (अध्यक्षा, मनस्विनी मंच, वर्धा) यांना भूषविले. या कार्यक्रमाला पोलीस विभागातील आशा डांगे, मिस महाराष्ट्र सुपर मॉडेल, सुनैना डोंगरे, बॉडी बिल्डर, गोल्ड मेडलिस्ट USA प्राप्त, अल्का लोखंडे, सचिव आधार ग्रामीण विकास बहुद्देशीय संस्था कोरा, तसेच सौ. वर्षाताई स. पडवे (अध्यक्ष वसुंधरा फाऊंडेशन यवतमाळ ) अशा सीमाताई मुख्याध्यापिक प्रा. शाळा, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमादरम्यान समाजकार्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.🎖️ बॉडी बिल्डर सुनैना डोंगरे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.🎨 चित्रकार विवेका पारवे यांचा कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मा. अश्विनी ताई काकडे व शुभांगी ताई ठमेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.🌿 अलका लोखंडे (सचिव, आधार विकास ग्रामीण बहुद्देशीय संस्था, कोरा) यांचा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.🌼 तसेच वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षाताई स. पडवे यांचा समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत महिलांनी गरबा सादर करून नवरात्रीचा उत्सव अधिकच रंगतदार बनविला. पारितोषिक स्पर्धा, नृत्य, आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन समर्थ बहुउद्देशीय संस्था व वैष्णवी फॅशन अँड डिझायनिंग क्लास यांच्या पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळ, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले.हा सोहळा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रेरणादायी व्यक्तींना गौरविणारा ठरला आणि एकात्मतेचा सुंदर संदेश देऊन अविस्मरणीय ठरला.
byMEDIA POLICE TIME
-
0