पक्ष प्रवेश...*दिनांक.11/11/2025 ला *हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवक, समाजसेवकांसह दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश..!*. आज नागपूर येथे *माजी ग्रहमंत्री अनिलजी देशमुख साहेब, खासदार अमरभाऊ काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले* यांच्या उपस्थितीत हिंगणघाट शहरातील समाजसेवक, माजी नगरसेवक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर भव्य प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.हिंगणघाट शहरातील समाजसेवक आणि तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या विचारसरणीवर आणि लोकाभिमुख कामगिरीवर जनतेचा विश्वास वाढत आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या आगमनामुळे पक्षाचे वर्धा जिल्ह्यात संघटन अधिक बळकट होईल असे माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.यावेळी *शुभांगीताई डोंगरे (माजी नगरसेविका), सुनिलभाऊ डोंगरे (समाजसेवक), गौतमजी कोठारी (समाजसेवक), चंदाताई कोठारी, जितूभाऊ कुकसे (माजी न. पा. उपाध्यक्ष), गुड्डूभाऊ शर्मा (माजी न. पा. उपाध्यक्ष), आशिषभाऊ देवतळे (माजी नगरसेवक सिंदी रेल्वे), दिनेश उर्फ दादा देशकरी (माजी नगरसेवक), अनिलजी बुलानी, सुनिल भोमले (माजी नगरसेवक सिंदी रेल्वे),संजयजी नेहरोत्रा (सेवानिवृत्त शिक्षक),किरणताई चौहान, गुणवंताभाऊ कारवटकर, नानाभाऊ पुंड, अमोलभाऊ वाघमारे, अमोलभाऊ हरडे, मन्नूभाऊ मकरे* आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. सर्व नव्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला पक्षाचे जेष्ठ नेते सुनिल राऊत, जेष्ठ नेते बबनराव हिंगणेकर, तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, मोहम्मदभाई रफिक,सुधाकर खेडकर, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे,माजी नगराध्यक्षा सुनीता कलोडे, प्रवीण श्रीवास्तव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा सचिव श्रीकांत भगत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0