अडावद येथे जनगणना अभियानास जिल्हाधिकारी यांची भेट: प्रगणकांना दिल्या सूचना तर ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे केले आवाहन.... अडावद ता. चोपडा येथे जनगणना २०२७ चे काम सुरू आहे. सदर कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे आले होते. त्यांनी पदभार सांभाळ्यापासून चोपडा तालुक्यात प्रथमच भेट दिली. ११ रोजी दुपारी चार वाजता सुभाष चौक बालाजी मंदिर परिसरात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट दिली. त्यांचे सोबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मंडलाधिकारी अजय पावरा, सरपंच बबनखाँ तडवी, पंचायत समिती चोपडाचे विस्तार अधिकारी जे. पी.पाटील, ग्राम आधिकारी प्रमोद सैंदाने, ग्राम महसूल अधिकारी विजेंद्र पाटील, जनगणना करणारे पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जनगणना कार्यक्रम २०२७ सुरू आहे. त्या कामकाजाची पाहणी केली. प्रथमच डिजिटल स्वरूपात जनगणना करण्यात येत असल्याने यातील ऍप मधील अडचणी जाणून घेतल्या. ते कसे काम करते याबद्दल सविस्तर चर्चा करून पर्यवेक्षक व प्रगणक यांचेशी चर्चा करीत त्यांना सूचना केल्यात.जळगांव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर जनगणना फक्त चोपडा तालुका घेतलेला आहे. जनगणना २०२७ ही जनगणनेच्या इतिहासातील भारताची पहिली ही संपूर्ण डिजिटल स्वरूपात जनगणना होणार आहे. पहिल्या टप्प्यात इमारती गणना घरे आणि कुटुंबे ओळखून त्याचे भौगोलिक स्थान निश्चित केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना होणार आहे. ही जनगणना दोन ऍप द्वारा होणार आहे. प्रथमच स्व–गणनेची पद्धतही सुरू करण्यात येत आहे. या पद्धतीने व्यक्तींना वेब पोर्टलच्या माध्यमातून स्वतःची माहिती सुरक्षितपणे स्वतःच भरता येणार आहे. याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विकास सोसायटी संचालक सचिन महाजन, माजी उपसरपंच हनुमान महाजन, माजी पंचायत समिती उप सभापती ताहेर मण्यार, माजी उपरपंच जावेदखा पठाण, रियाजअली सैय्यद, नितीन राजकुळे, सचिन पुराणिक, निर्जला ठाकूर, एस. जी.महाजन, यांचेसह पर्यवेक्षक व प्रगणक ग्रामस्थ उपस्थित होते.

अडावद येथे जनगणना अभियानास जिल्हाधिकारी यांची भेट: प्रगणकांना दिल्या सूचना तर ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे केले आवाहन....                                                                     
Previous Post Next Post