दिनांक 11/11/25 डोंगर कठोरा तालुका यावल ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार नको तिथे ग्रामपंचायतीकडून रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात आला पण गावातील मेन रस्ता म्हणजेच डॉ आर सी झांबरे यांच्या हॉस्पिटल समोरून भिरूड वाडा राणे वाडा तडवी आदिवासी वाडा कडे जाणारा रस्ता हा गेली 3 वर्ष्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे गावातील जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ योजना राबवली गेली आहे त्या मुळे गावात अगोदरच बऱ्याच गल्ली बोळातील रस्त्याचे काँक्रीटिंग झाले होते नंतर घरोघरी नवीन व जुन्या कनेक्शनवर नळ देण्यात आले असता ते काँक्रिटिकरण खोदून बरेच दिवस झाले असून अद्याप ते दुरुस्थी केले नाही त्या मुळे रस्त्याने गाडीवरून जाणारे भगवान भारंबे यांची गाडी रस्त्यात नुसती रेती व दगड टाकल्यामुळे स्लिप होऊन त्यांच्या पायाला दुखापत झाली अर्जुन भारंबे यांच्या पण पायाचा कंबरेचा बॉल ला मार लागून त्यांचे ऑपरेशन करावे लागले व त्यामुळे त्यांचे निधन झाले असे तेथील महिला पुरुष गावकरी यांचे म्हणणे आहे तसेच या पूर्वी आणि रोज या ठिकाणी गाड्यावरून जाणारे येणारे लोक पडत असतात व तेथील रहिवाशी यांचे लहान मुलं मुली पण बाहेर निघाल्यावर जागीच पडत असतात हा रस्ता चांगलाच रहदारीचा असल्यामुळे मागील माजी सदस्य व विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री चंदू भाऊ भिरूड यांनी त्यांच्या घरासमोरील रस्त्याचे काम लवकर करण्यासाठी त्यांच्या वाड्यातील लोकांन कडून घर कमिटी एकूण 60 हजार रुपये भरले असता तरी हि ग्रामपंचायत चे रस्ता दुरुस्थी साठी मुहूर्त निघाले नाही त्यांनी बऱ्याच वेळा सरपंच ग्रामसेवक यांना तोंडी सांगितले होते आणि आहे तरी देखील त्यांनी या कामा कडे जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले आहे असे गावातील ग्रामस्थमध्ये चर्चा आहे ज्या ठिकाणी अगोदरच काँक्रिटीकरण झालेले आहे त्याच दलित वस्थित परत डबल काँक्रिटीकरण करण्यात आले आहे व ज्या ठिकाणी दलित वस्तीत रस्ता खराब झाला आहे ते ठेकेदार यांनी त्यांचे मनाने निकृष्ठ काम करून शासनाचा लाखो रुपयाचा निधी घेण्यात आला त्यात नागरिकांच्या समस्या कडे जबाबदार कोण असा प्रश्न उपस्तित झाला आहे यावर आपल्या जळगाव जिल्यातील संबंधित अधिकारी सखोल चौकशी करून काय कार्यवाही करतील या कडे ग्रामस्थाचे लक्ष लागून आहे
byMEDIA POLICE TIME
-
0