नांदेडमध्ये ऐतिहासिक हातमिळवणी : काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र.. (मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड )नांदेड :सम-समान-सन्मान” या आधारावर ऐतिहासिक आघाडीची नांदेड जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा खासदार विवेक चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारूक अहमद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.दोन्ही पक्षांनी पदाधिकारी स्तरावर चर्चा करून “सम-समान-सन्मान” या तत्वावर आघाडी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीचे उद्दिष्ट जनहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण हे आहे.आघाडी संदर्भातील जागावाटप व रणनीतीसंबंधी चर्चा मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावर टीएमसी माध्यमातून पार पडली. चर्चेनंतर ठरविण्यात आले की तात्काळ 13 नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे भाग घेतील.पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. वंचित आघाडीने ठाम भूमिका मांडली की “2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत, ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुन्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात मागणी काँग्रेसच्याही नेत्यांनी मान्य केली असून दोन्ही पक्षांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सहमती दर्शवली आहे. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेडमध्ये ऐतिहासिक हातमिळवणी : काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र..                                                 
Previous Post Next Post