.*जन्माला येण्यापूर्वीच बालकन्यची हत्त्या होत असल्याने सून मिळणे अवघड**@)>पं. भागीरथ सारस्वत महाराज*. (*मानवत / प्रतिनिधी.*)—————————————— जन्माला येण्यापूर्वीच बालकन्याची हत्या केली जात असल्याने. आज सुनेसाठी तरसावे लागत आहे.... पंडित भागीरथजी सारस्वत महाराज सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व समाजामध्ये आपले वंश पुढे चालण्यासाठी मुले जन्माला यावी यासाठी गर्भाशयामध्ये जन्माला येणाऱ्या कन्याची गर्भाशयात हत्या केली जात आहे. समाजाला हा लागलेला फार मोठा कलंक आहे. कन्या भ्रूणहत्या मुळे समाजात मुलींची संख्या कमी होत आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये सुना मिळत नसल्याने अनेक कुटुंबीयांना तरसावे लागत आहे. असे विचार सेलू निवासी भागवत कथाकार पंडित भागीरथजी सारस्वत महाराज यांनी येथील गिरिधारीलाल काबरा यांच्या निवासस्थानी श्रीमद्भागवत कथेच्या आयोजन प्रसंगी पाचव्या दिवशी चे पंचम पुष्प गुफंताना त्यांनी कथेच्या माध्यमातून सांगितले.कथेच्या माध्यमातून सारस्वतजी महाराजांनी समाजात येणाऱ्या गंभीर समस्येबाबत उद्देशून आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाले. आपण एखाद्याला तन-मन-धनाने दान करत असाल तर. परमात्मा आपल्याला भरपाई म्हणून यापेक्षा दुप्पट धन देईल. दान करताना निस्वार्थपणे भाव असावा तरच त्याचे फळ मिळते. यात कुठलाही स्वार्थ नसावा. तुम्ही दुसऱ्यांना आनंदाने जगू द्या.तुमच्या मार्गात कुठल्याही अडचणी येणार नाहीत. सध्या समाजात पुत्ररत्न व्हावा आपल्या वंशाला कुलदीपक व्हावा या उद्देशाने जन्माला येणाऱ्या बालकन्याची गर्भाशयात हत्या केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भ्रूणहत्येमुळे समाजात गंभीर प्रश्न निर्माण झाला. असून यामुळे समाजाला एक प्रकारचा कलंक लागला आहे. यामुळे विवाह योग्य मुलांना मुलगी मिळत नसल्याने मुलाकडील कुटुंबीयांना वाईट परिणाम भोगावे लागत आहे. सुना मिळत नसल्याने सारे कुटुंब दुःखी आहे. मित्र कसा असावा याबाबत त्यांनी योग्य उदाहरणाद्वारे विचार व्यक्त करताना म्हणाले. मित्र हा सुदामा सारखा असावा. आपणावर पडलेल्या संकटात घाऊन येणारा मित्र असावा. संकटात साथ देणारा खरा मित्र आहे. जोपर्यंत आपल्याकडे धन आहे .तोपर्यंत मित्र आपणाला साथ देतात. ज्या दिवशी आपले धन संपेल त्यादिवशी मित्र आपला साथ सोडून जाणार. असा मित्र नसावा. चांगले मित्र नसल्याने अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. श्रीमद् भागवत कथा ज्ञान आपणाला जेवढे ज्ञान हवी आहे ते ज्ञान विज्ञान यांचे दुर्मिळ संगम आहे. आपणाला जेवढे ज्ञान हवे आहे तेवढे ज्ञान श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमातून रसग्रहण करा. आज आपण परकीय संस्कृतीच्या माध्यमातून आपली हिंदू संस्कृतीला मागे सारत आहोत. आपणाला हिंदू संस्कृतीचा विसर पडला आहे. आपला हिंदू धर्म व संस्कृती चांगले संस्कार यांना विसरू नका. आपल्या परंपरांचे पालन करा. परंपरा एक प्रकारे लुप्त होत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची पवित्र चिन्ह म्हणून गोमाता असून घ्या गोमातेची योग्य सेवा पूजन करा. परंतु परकीय संस्कारामुळे आपण गाई पाळण्याएवजी लाखो रुपये खर्च करून उच्च जातीचे कुत्रे पाळत आहोत. हीच खरी शोकांतिका आहे. आपल्या घरात एखादा आजारी व्यक्ती असताना त्याची सेवा करण्याऐवजी आपण लाखो रुपये खर्च करून आणलेल्या कुत्र्याची तन्मनाने सेवा करत आहोत. श्रीमद् भागवत कथेच्या आयोजनात कथेच्या माध्यमातून पाचव्या दिवसाचे पाचवे पुष्प गुंपताना श्रीकृष्ण लीला, गोवर्धन पूजन, रुक्मिणी स्वयंवराचे वर्णन भागवत कथाकार श्री भागीरथजी महाराज सारस्वत यांनी आपल्या अमृतमय वाणीतून मार्गदर्शन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.***
byMEDIA POLICE TIME
-
0