चंद्रपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचा दुसरा विजय*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भदावती दि.16:- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक येथे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2025 ते 2030 यात चंद्रपूर जिल्ह्यातून *भारतीय जनता पार्टीचे*श्री. मंगेशजी धाडसे सभापती कृषी उत्त्पन्न बाजार समिती चिंमूरचे* हे 18 विरुद्ध 23 मतांनी विजयी झाले. यात धाडसे यांनी काँग्रेसच्या गजानन जुमनाके उमेदवाराचा पराजय केला.ही निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. बंटीभाऊ भांगडीया यांचे मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचे नेतृत्वात लडल्या गेली.या विजयी उमेदवाराचे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहिर,आमदार किशोरभाऊ जोरगेवार,आमदार श्री. करण देवतळे यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टीने आपले शिक्कामोर्तब केले. या विजयात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे तथा उपाध्यक्ष श्री. संजय डोंगरे यामध्ये बँकेचे संचालक आवेश खान पाटण,गणेश तळवेकर, माजी संचालक पांडुरंग जाधव यांनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास विजयश्री मिळवून दिली. या विजयाकरिता सर्व स्तरातून भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचा दुसरा विजय*.                                                                                 
Previous Post Next Post