शहाद्यातील व्यावसायिकाची ‘भ्रमणध्वनी ॲप’द्वारे सुमारे 18 लाखांची फसवणूक; माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल. ( प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा उपसंपादक)शहादा : भ्रमणध्वनी ॲपद्वारे जादा पैशांचा परतावा देण्याच्या आमिषाने शहादा येथील एका विमा व्यावसायिकाची तब्बल 17 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजय रमाकांत पाठक (वय ४०, रा. सरदार पटेल नगर, लोणखेडा मार्ग, शहादा) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पाठक यांचा विमा व्यवसाय आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दि. 28 सप्टेंबर रोजी पासून ते 9 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या कालावधित आरोपी 'मोनार्क फिन' (MONARCH FIN) नावाच्या समूहातील ॲडमिन (प्रशासक) आणि इतर सभासदांनी तसेच मोनार्क 2/3 (4) आणि मोनार्क 62 या व्हॉट्सॲप समूहातील ॲडमिन व सदस्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सदर ॲपद्वारे जास्त पैशांचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादीला वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.फिर्यादी विजय पाठक यांचे पैसे त्यांच्या नंदुरबार शाखेतील आयसीआयसीआय बँक खात्यातून फोन-पे आणि आरटीजीएस द्वारे विविध संस्थांच्या खात्यांमध्ये एकूण 17 लाख 80 हजार रुपये वळवण्यात आले. फोन-पे द्वारे जमा त्यांनी ए.एस. इंटरप्राईजेस- बंधन बँक आणि एस.के. इंटरप्राईजेस व एपी असोसिएट- बँक ऑफ बडोदा यात 28 सप्टेंबर 2025 रोजी 30 हजार आणि 60 हजार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी 30 हजार आणि 07 नोव्हेंबर 2025 रोजी 40 हजार रुपये जमा करण्यात आले. तसेच प्रशांत ट्रेडिंग आणि महावीर इंटरप्राईजेस- बँक ऑफ बडोदा शाखेत 09 नोव्हेंबर 2025 रोजी 10 लाख रुपये आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी 6 लाख 20 हजार रुपये आरटीजीएसने जमा करण्यास भाग पाडले.या फसवणुकी प्रकरणी मोनार्क फिन समूहातील ॲडमिन आणि इतर सदस्य तसेच व्हॉट्सॲप समूह ॲडमिन व सदस्य यांच्याविरोधात दि. 15 नोव्हेंबर रोजी शहादा पोलिसात भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम 420, 406, 419, 34, 504, 506 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(सी) व 66(डी).कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेंमत पाटील हे करत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0