**छाननी प्रक्रिया मानवत नगर परिषदेमध्ये शांततेत संपन्न. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————————नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन (उमेदवारी अर्ज) छाननी प्रकिया शांततेत संपन्न.मानवत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने अध्यक्ष व प्रभाग निहाय प्राप्त उमेदवारी अर्ज छान नी प्रकियेचा एक टप्पा आज दिनांक 18/11/2025 रोजी शांततेत नगरपालिकेच्या सभागृहात पार पडला असून अध्यक्ष पदासाठी प्राप्त ( 07) तर सदस्य पदासाठी एकूण 11 प्रभागात ( 117 )एवढी उमेदवारी अर्ज प्राप्त झाली होतीमा.राज्यनिवडणूक आयोगाच्या दि.04/11/2025 च्या आदेशानुसार दि.10/11/2025 ते दि.17/11/2025 या कालावधीत अध्यक्ष पदासाठी प्राप्त 07 तर सदस्य पदासाठी प्राप्त एकूण 117 उमेदवारी अर्जाची छाननी प्रकिया सकाळी11.00 सुरू करण्यात आली त्यावेळी प्रथम अध्यक्ष पदासाठी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली त्यामध्ये प्राप्त (07) अर्जातून( 04)अर्ज पात्र ठरले तर सदस्य पदासाठी प्राप्त (117) अर्जातून( 87 ) एवढी अर्ज सदस्य पदासाठी पात्र ठरले.सदर प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मानवत श्री पांडुरंग माचेवाड तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री संजय खिल्लारे, नायब तहसीलदार मानवत दुसरे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सह आयुक्त तथा मुख्याधिकारी श्री महेश गायकवाड यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून श्री माधव वडजे,मंडळ अधिकारी श्री बिडवे, ,नप चे शहर अभियंता सय्यद अनवर यांचे सह नप मानवत व तहसील कार्यालय मानवत चे अधिकारी,कर्मचारी हजर होते,या सर्व प्रकिया वेळी सूक्ष्म निवडणूक निरीक्षक श्री अमित कुमार हजर होते.***

*छाननी प्रक्रिया मानवत नगर परिषदेमध्ये शांततेत संपन्न.                                                                                   
Previous Post Next Post