**पक्षाने एबी. फार्म न दिल्याने मानवतकरांची सेवा करण्याची संधी हूकली.* *©)>अॅड किरण भैय्या बारहात्ते.**{ खंत व्यक्त करतांनी मन भारावले }. (*मानवत / प्रतिनिधी.सोशल मिडीयाच्या पोष्ट मुळे हळहळ व्यक्त प्रिय बंधू आणि भगिनींनो मागील 9 वर्षाचा नगरसेवक पदाचा माझा प्रवास आज खऱ्या अर्थाने थांबला. पक्षाने मला आपल्या प्रभागातून महिला गटातून उमेदवारी देऊन ऐनवेळी AB फॉर्म न दिल्याने माझी उमेदवारी आज रद्द झाली.मागील 9 वर्षात मी माझ्या परीने आपल्या सर्वांची कामे करण्याचा मनोभावे प्रयत्न केले या दरम्यान जवळपास संपूर्ण प्रभागात सिमेंट रस्त्याची कामे झाली, गटारे सुधारण्यात मी बऱ्या प्रमाणावर प्रयत्न केले सर्वात महत्वाचे विकास फक्त रस्ते नाल्या पुरता मर्यादित न ठेवता ओपन स्पेस डेव्हलप करण्याचे प्रयत्न केले त्यात ही बऱ्या प्रमाणात यश प्राप्त झाले व गावात सर्वात जास्त आज 5 उद्याने आपल्या प्रभागात आहेत. पाणी, घंटा गाडी साठी, बंद पडलेल्या लाईट साठी आपण मला नेहमी कॉल करत व माझ्या परीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करी इथेनपुढे ही माझ्या परीने आपल्या सर्वांचे काम करण्याचे प्रयत्न करेल.या सर्वात एकच गोष्टीचे वाईट वाटते आहे की सोबतच्या लोकांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला व ऐन वेळी माझी निवडून येणारी जागा नवख्या उमेदवाराला देऊ केली, त्यांना माझ्या शुभेच्छाच राहतील.शेवटी आपल्या सर्वांनी इतके दिवस नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद काही चूक झाली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावे. आपलाॲड किरण सुरेशराव बारहाते, पाटील.***

*पक्षाने एबी. फार्म न दिल्याने मानवतकरांची सेवा करण्याची संधी हूकली.*    *©)>अॅड किरण भैय्या बारहात्ते.**{ खंत व्यक्त करतांनी मन भारावले }.                                        
Previous Post Next Post