हिप्परगा थडी येथे, अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथराज पारायण सोहळा प्रारंभ. (.मारोती एडकेवार जिल्हा :प्रतिनिधी नांदेड) नांदेड : मानव जीवनासाठी धर्म हा महत्त्वाचा असून, त्याचे आचरण करणे, व प्रसार करणे हा प्रत्येक मानवाचे,कर्तव्य आहे.हा उद्देश मनाशी धरून हिप्परगा थडी येथे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, अखंड शिवनाम सप्ताह वर्ष सातवे,परमरहस्य ग्रंथराज परायण सोहळा.आयोजित करण्यात आले आहे,सप्त्याचे प्रारंभ 21/11/2025 रोज शुक्रवार रोजी सुरुवात झाले आहे.परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या,आशीर्वादाने पंचकळस दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी परमपूज्य 108 परमपूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, यांच्या हस्ते प्रारंभ झाला आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व,भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे,की आपण या अखंड शिवनाम सप्ताह मध्ये ज्ञानी वंताचे विचार, आपण आत्मसात करावे व आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करून घावे, व अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता दि.28.11.2025 रोज शुक्रवारी,महाप्रसादाच्या कार्यक्रमाने होईल, भजनी मंडळ शेवाळा, सगरोळी, दौलतापुर,शिंपाळा, बोळेगाव, केसराळी,तमलूर, मलकापूर,आलूर,व रामपूर, शेळगाव,भजनी मंडळ राहतील तरी, या सात दिवसाच्या सप्त्याच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये, सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी उपस्थिती राहून, आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, हिप्पारगा थडी येथे,शिवनाम अखंड सप्ताह आयोजन करण्यात आले,आहे तरी आपण या सप्त्यामध्ये उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती समस्त गावकरी मंडळी हिप्परगा थडी, व्यवस्थापक श्री महात्मा बसेश्वर मित्र मंडळ हिप्परगा थडी.

हिप्परगा थडी येथे, अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथराज पारायण सोहळा प्रारंभ.                                                              
Previous Post Next Post