हातेड खुर्द ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून शिवसैनिक श्री. निरंजन मनोहर सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते, विकासपुरुष मा. आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसैनिक उद्योजक श्री. राहुल सोनवणे आणि श्री. भूषण बाविस्कर यांच्या सूचनांवरून ही निवड शर्थीने पार पडली. या प्रसंगी ग्रामपंचायतीतील सर्व मान्यवर, ग्रामस्थ, युवक प्रतिनिधी, महिला बचतगट सदस्य, तसेच शिवसैनिक बांधव उपस्थित होते. गावाच्या एकात्मतेचा, प्रगतीचा आणि सलोख्याचा नवा अध्याय या निवडीमुळे सुरू झाल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर श्री. निरंजन मनोहर सोनवणे यांनी ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की— “गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील. मा. आमदार चंद्रकांतदादा यांच्या विकासदृष्टीने प्रेरित होऊन हातेड खुर्द गावाला पुढील काळात आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.” ग्रामस्थांनी निरंजनभाऊंच्या शांत, साध्या आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या स्वभावामुळे गावाला विकासाची नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सरपंच सौं. शालिनीताई रमेश सोनवणे सौं उज्वलाताई सुनील बाविस्कर सौं अनिताताई शिरसाठ श्री रमेश हिंम्मतराव सोनवणे श्री पंडित शिरसाठ श्री रवींद्र पंडित सपकाळे श्री रमेश विठ्ठल सोनवणे श्री निंबाजी श्रीराम सूर्यवंशी श्री रमाकांत देवराज श्री ज्ञानेश्वर अहिरे श्री अनिल बबनराव सोनवणे श्री. सुनील जगातराव पाटील श्री शिवाजी देविदास बाविस्कर श्री रोहिदास भालेराव कोळी श्री सुनील मुरलीधर कोळी श्री वसंतभाऊ रायसिंग श्री किशोर आत्माराम सोनवणे श्री प्रभाकर बळीराम सोनवणे श्री दीपक गोविंदा पाटील श्री नरेंद्र बाविस्कर श्री बबलू मोरे श्री प्रितेश बाविस्कर श्री महेश बाविस्कर श्री हर्षल बाविस्कर

Previous Post Next Post