हिंगणघाट शहरातील समाजसेवक प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश* आ. समीर कुणावार यांची प्रमुख उपस्थिती..*. हिंगणघाट,दि.१७ नोव्हेंबर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन स्थानिक हिंगणघाट शहरातील समाजसेवक प्रदीप उर्फ सोनू आर्या यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश घेतला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार समीर कुणावार यांचेसह भाजपा ज्येष्ठ नेते किशोरभाऊ दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, संजय डेहणे , वामनराव चंदनखेडे, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर तालुका भाजपा अध्यक्ष हेमंत राऊत, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, शरद कोणप्रतिवार, देवा वाघमारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. समीर कुणावार यांनी प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांना भाजपाचा शेला देऊन सन्मान करीत त्यांचे जगातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपामध्ये प्रवेश केल्याने स्वागत केले. पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करीत आ. कुणावार यांनी पक्षाचे ध्येयधोरणांचा समाजात प्रचार करण्याचे आवाहन केले.यावेळी प्रदीप उर्फ सोनू आर्य, प्रकाश आहूजा, काली मोटवानी, अशोक चनगलांनी, राजु मोटवानी, प्रदीप हेमनानी ,सुमित सामतानी , राजेश लखानी, विजय मोटवानी, दीपक चंदानी , रमाकांत मांदाडे, निखिल लेनगुरे, रोहित कोठारे, सतीश काचेवार, संजय जवंजाळकर, मधुकर लांडगे, पप्पू काका मोटवानी, राम काका दुब्बानी, रमेश मीहानी इत्यादी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत रितसर प्रवेश देण्यात आला.

हिंगणघाट शहरातील समाजसेवक प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश*                                            आ. समीर कुणावार यांची प्रमुख उपस्थिती..*.                             
Previous Post Next Post