स्थानबध्द झालेल्या इसम भोजराज जंगले यास घेतले गुन्हेप्रकटीकरण पथकाने ताब्यात पोस्टे हिंगणघाट हद्दीत सराईत गुन्हे करणारा इसम नामे भोजराज तुकाराम जंगले वय 30 वर्ष रा. खंडोबा वार्ड हिंगणघाट यांचेविरुध्द गांजा विक्री,दारूविक्री व शरीरा विरूध्दचे एकून 25 गुन्हे दाखल असल्याने सदर इसम हा वांरवार गुन्हे करण्यास सरसवलेला असून त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरात भिती व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याचेविरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार, व जिवनावश्यक वस्तूचा काळाबाजार करणारे यांचा विघातक कृत्यांचा आळा घालण्याबाबतचा अधिनीयम 1981 अन्वये एमपीडीए प्रस्ताव मंजूर झाल्याने सराईत गुन्हेगार यास भीती निर्माण झाल्याने पोस्टे हिंगणघाट हद्दीतून पसार होवून बुटीबोरी येथे असल्याची माहीती मुखबीर कडून प्राप्त करून मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. यांचे आदेशाने डीबी पथकांचे पोहवा/1234 प्रशांत ठोंबरे हे त्यांचे पथकासह बुटीबोरी येथे रवाना होवून सराईत गुन्हेगार भोजराज जंगले याचा अवघ्या 3 तासांत शोध घेवून त्यास ताब्यात घेवून पोस्टे ला परत आले. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. अनिल राऊत, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि दिपक वानखडे सा. व सपोनी पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे, पोशी रोहीत साठे,पो.शि. मंगेश वाघमारे, यांनी केली.

Previous Post Next Post