यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये दावेदारीची चुरस वाढली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले युवा कार्यकर्ते सागर कुमार सुनील चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश बारी यांच्या पत्नी सौ. वैशाली निलेश बारी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. सागर चौधरी यांचा यावल शहरातील विविध प्रभागांशी दांडगासंपर्क असून शांत व मनमिळाऊ स्वभाव, तसेच नवरात्र, गणेशोत्सव आणि इतर धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. भुसावळ येथील चौधरी परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध असून तेथील प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी स्वतः त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे, सौ. वैशाली बारी यांच्या पती निलेश बारी यांचेही समाजात चांगले प्रभुत्व असून शांत, मनमिळाऊ कार्यशैलीमुळे त्यांची चांगली ओळख आहे. या प्रभावाचा लाभ सौ. वैशाली बारी यांना मिळत असल्याचे पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक ८ मध्ये बारीवाडा, कोलतेवाडा, गुरववाडा, वाणी गल्ली व खिन्नीपुरा हे भाग येतात. दोन्ही उमेदवारांना या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकता निर्माण झाली आहे.

byMEDIA POLICE TIME
-
0