वंचित बहुजन आघाडीच्या चौहटा बाजार परिसरातून निवडणुकीची चर्चा रंगते अकोट तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची लगबग सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे चौहटा बाजार परिसरातील सक्रिय कार्यकर्ते आणि पक्षाचे अकोट तालुका उपाध्यक्ष श्री. गोपाल भाऊ रामेश्वर ढोरे यांच्या घराण्याकडून महत्त्वपूर्ण राजकीय हालचाली वेग घेताना दिसत आहेत.विश्वसनीय सूत्रांनुसार, जिल्हा परिषद चौहटा बाजार सर्कल किंवा वरुर जिल्हा परिषद सर्कल यापैकी कोणत्याही सर्कलमधून पक्षाने जबाबदारी दिल्यास श्री. गोपाल भाऊ ढोरे यांच्या अर्धांगिनी सौ. सुजाता गोपाल ढोरे चौहटा सर्कल महासचिव हटआगामी निवडणूक रिंगणात उतरविण्याचा गंभीर विचार सुरू आहे.श्री. गोपाल भाऊ ढोरे हे वंचित बहुजन आघाडीचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असून चौहटा बाजार परिसरात सामाजिक आणि राजकीय कामासाठी त्यांची स्वतंत्र ओळख आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेच्या विस्तारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने त्यांचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात विश्वासार्ह मानले जाते.परिसरातील कार्यकर्त्यांमध्येही या शक्यतेबद्दल सकारात्मक चर्चा असून महिला नेतृत्वाला पुढे आणण्याच्या पक्षाच्या भूमिकेशीही हा निर्णय सुसंगत असल्याचे मानले जात आहे. ढोरे दाम्पत्याचे ग्रामीण भागातील संपर्क, सामाजिक काम, आणि कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण नाते यामुळे त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे.पक्षाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा असली तरी, चौहटा बाजार आणि वरुर परिसरात ढोरे कुटुंबाच्या संभाव्य उमेदवारीमुळे निवडणुकीचे वातावरण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Previous Post Next Post