आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशाने डॉ. नयना उमेश तुळसकर यांना हिंगणघाट नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. माझ्या सह पक्षाचे प्रभागातील उमेदवार, पक्षातील प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या साक्षीने आज त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.हिंगणघाटच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा प्राधान्याने पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते-विकास, नव्या संधींना वाव देणारी पायाभूत सुविधा आणि महिला व युवक सक्षमीकरण यांसारखे अनेक मुद्दे आपल्या कार्यसूचीतील महत्त्वाचे घटक असतीलहिंगणघाट शहराने गेल्या काही वर्षांत जे बदल पाहिले आहेत ते आणखी गतिमान करण्यासाठी अनुभवी, शिक्षित आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे, आणि ती भूमिका डॉ. नयना तुळसकर अत्यंत समर्थपणे पार पाडू शकतात.हिंगणघाट शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा आजचा दिवस निश्चितच ऐतिहासिक ठरला.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byMEDIA POLICE TIME
-
0