अडावद विकासो चेअरमनपदी शोभाबाई पाटील बिनविरोध : १११ वर्षात पहिल्यांदा महिला चेअरमन अडावद ता.चोपडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शोभाबाई संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १११ वर्षात पहिल्यांदा महिलेला चेअरमन पदाचा मान मिळाला. १९ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात चेअरमन निवडीची सभा संपन्न झाली. यावेळी चेअरमन पदासाठी शोभाबाई पाटील यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी भुषण बारी यांनी चेअरमनपदी शोभा संजय पाटील यांची बिनविरोध निवड घोषीत केली. यावेळी व्हा.चेअरमन वैजयंताबाई माळी, भुषण देशमुख, रमेश काबरे, प्रभाकर माळी, प्रदिप पाटील, प्रकाश माळी, गोटु धनगर, रमेश ठाकुर, रामदास चौधरी, सचिन महाजन, शकीलोद्दीन शेख हे उपस्थित होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी भुषण बारी यांना सचिव छगन गवळी, संभाजी देशमुख, प्रशांत देशमुख यांनी सहकार्य केले. चेअरमन निवड होताच लोकनियुक्त सरपंच बबनखाँ तडवी, माजी लोकनियुक्त सरपंच भावनाताई पंढरीनाथ माळी, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्या भारतीताई सचिन महाजन, विजिता हरिश पाटील, मंगल गुलाबराव पाटील, अश्विनी रविंद्र पाटील,पुनम भुषण पाटील, शीतल विशाल पाटील, माजी चोसाका संचालक मनोज देशमुख, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, मु.ना. पाटील पतसंस्थेचे चेअरमन गुलाबराव पाटील, पत्रकार नवल चव्हाण, संजय देशमुख, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील, हरिश पाटील, माजी उपसरपंच मधुकर कासार, याकुबअली काझी, हाफिज मलक, प्रमोद देशमुख, उमेश देशमुख, अनिल देशमुख, विशाल पाटील, नाना पाटील, सुरेश पाटील, पि. आर. माळी यांनी अभिनंदन केले.
byMEDIA POLICE TIME
-
0