निष्ठावंतांच्या हाती दिल्या तुरी..!आयारामाना संधी -राजकारण. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी सेलू :) सेलू नगरपालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपकडून तसेच महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी मिळेल याचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता.मात्र शिंदे गटाने अकेला चलो ची भूमिका घेत आपले स्वतःचे उमेदवार उभे करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.मात्र सायंकाळी उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले अन् काही इच्छुक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. उमेदवारीत आयारामांना संधी देत निष्ठावंताच्या हाती तुरी दिल्याची भावना उघडपणे समाजमाध्यमांवर पक्षश्रेष्ठींच्या नावाने नाराजी व्यक्त करत आहेत.विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली होती. यात भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन शहरातून मेघना बोर्डीकर यांना मताची चांगली आघाडी दिली होती. त्यानंतर त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. आपले आमदार मंत्री झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते नगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागले होते. विधानसभा निवडणुकीत केलेले काम लक्षात घेऊन आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना होती. मात्र विनोद बोराडे यांच्या प्रवेश प्रक्रियामुळे सर्व चित्र बदलले गेले आहेत. उमेदवारी देताना निष्ठावंतांना न देता आयारामांना प्राधान्य दिल्याची खंत समाजमाध्यमांवर उमेदवारी नाकारलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते समाजमाध्यमांवर भावना व्यक्त करीत आहेत. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना ऐनवेळी भाजपमध्ये घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांना उमेदवारीही देण्यात आली आहे. त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती; परंतु पक्षनिष्ठा लक्षात घेऊन आपल्याला उमेदवारी मिळेल, असा कयास निष्ठावंत कार्यकर्त्यांनी लावला होता; त्यांनी स्वतःच्या प्रचाराची फेरी सुद्धा सुरू केली होती परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेन्स कायम ठेवत दुसऱ्याच उमेदवाराला पक्षाकडून संधी दिल्याने अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला.दरम्यान, भाजपकडून अनेक ऐनवेळी भाजपात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमातून, पक्षश्रेष्ठींकडे नाराजीची भावना व्यक्त केली. प्रभागातील ६मध्ये उमेदवार म्हणून असलेल्याला उमेदवारांने कसून प्रयत्न केले होते तसेच प्रभाग 16 मधील उमेदवारा पैकी मूळ भाजपचे सहा ते सात कार्यकर्ते आहेत. तर इतर ऐनवेळी पक्षात आलेले कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर असंतोष खदखदत आहे. अश्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनधरणीकडे लक्ष भाजपा कसे देते याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.काहींनी सक्रिय कार्यकर्ते पदाचा राजीनामा दिला आहे. तर अनेजण पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच उमेदवारी न मिळाल्याने अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. निष्ठावंत दुखावल्यामुळे भाजप उमेदवाराला सर्वांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. तसेच पक्षश्रेष्ठी याबाबत कार्यकर्त्यांची काय समजूत काढतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.ज्यांनी विधानसभेला भाजपच्या विरोधात काम केले अशा कार्यकर्त्यांना ऐनवेळी भाजपची उमेदवारी देण्यात आली. याचा राग भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. भाजप पक्षाचे काम तन-मन धनाने काम करूनही आपल्यावर अन्याय केला, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची झाली आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीनाट्च सुरू झाल्याचे दिसून येत आहे.जुन्या कार्यकर्त्यांच भूमिकेकडे लक्ष वेधून केले घेतले आहे.अनेक प्रभागांमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. भाजपला नगरपालिका निवडणुकीत मिळविण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे आवश्यक झाले आहे.ग्राउंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते नाराज झाल्यामुळे भाजप श्रेष्ठीला त्यांची मनधरणी करून मन वळवावी लागणार आहे. तसेच ज्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यांना माघार घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा भाजपला ही निवडणूक सोपी नसणार हे आता पाहणे गरजेचे आहे.तसेच विनोद बोराडे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्या मुळे मुस्लिम समाज हा नाराज झाल्याचे निदर्शनास येत आहे.सेलू मध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज कोणाकडे जातो यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ब्राह्मण, मारवाडी समाजाला अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने हा समाज सुद्धा नाराज झाल्याचे निदर्शनास येत आहे.

निष्ठावंतांच्या हाती दिल्या तुरी..!आयारामाना संधी -राजकारण.                                                                           
Previous Post Next Post