बेल्हेत विकासाची चार कोटींची पर्वणी! ग्रामपंचायतीकडून नूतन इमारतीसह विविध कामांचा शुभारंभ.. (बेल्हे,दि.(प्रतिनिधी)बेल्हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल चार कोटी तीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज ग्रामपंचायतीतर्फे मोठ्या उत्साहात पार पडले.या निधीतून नवीन ग्रामपंचायत इमारत उभारणीसाठी तीन कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ८० लाख नागरी सुविधा निधीतून, ६० लाख वित्त आयोग निधीतून, तर उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीकडून उभारली जाणार आहे.याशिवाय गावाच्या सौंदर्यवर्धनासाठी जिल्हा परिषद निधीतून वीस लाख रुपये खर्चून आकर्षक बगीचा तयार करण्यात येणार आहे. तसेच स्मशानभूमी बांधकामासाठी वीस लाख, आणि बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह व स्नानगृहासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी सरपंच मनीषा जानकु डावकर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, ग्रामविकास अधिकारी किशोर रायसिंग वाकडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने ही कामे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सरपंच मनीषा डावकर यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0