बेल्हेतील प्रियांका सोसायटीत दुपारी चोरी; बंद घरातून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास. (बेल्हे,दि.(प्रतिनिधी)कल्याण–अहिल्यानगर महामार्गावरील बेल्हे गावानजीक असलेल्या प्रियांका हाउसिंग सोसायटीत दुपारी झालेल्या धाडसी घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेआठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.अमर गजानन बांगर यांच्या बंद असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातून पाच लाख रुपयांची रोकड आणि साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.घटनेची माहिती मिळताच बेल्हे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दुपारच्या वेळेत झालेल्या या घरफोडीमुळे बेल्हे परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांबद्दल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0