आमदार कुणावार यांच्या प्रयत्नातून मोहगांव,तावी, वानरचुवा येथे १ करोड ५ लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचे भुमिपुजनसमुद्रपूर:मोहगांव ग्रामपंचायत अंर्तगत येथ असलेल्या मोहगांव,तावी,वानरचुवा येथील रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली होती.याची माहिती सरपंच विलास नवघरे यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांना देताच त्यांनी मागणीची दखल घेऊन मोहगांव फरीदपुर रस्याचे जिल्हा वार्षिक योजनेतून दुरुस्तीकरण १५ लक्ष रुपये,माडा योजनेअंतर्गत तावी झमकोली रस्ता १५ लक्ष रुपये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ७५ लक्ष रस्त्यांचे वानरचुवा मंगरूळ रस्त्याचे डांबरीकरण असे एकूण १ करोड ५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली असून या मंजूर निधीच्या कामाच्या भुमिपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरडचे सरपंच राजुभाऊ नौकरकर,अरुणभाऊ मोटघरे,बहादूरसिंग अकाली,विनोद कन्हाळकर विजयाताई तेलरांधे,लोमेशजी झिंगरे,रघुविर पारधे,राहुल गाढवे,नरेंद्रजी मिश्रा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिन्ही ठिकाणी भुमिपुजन करण्यात आले.यावेळी मोहगांव येथील माजी उपसपंच कैलास नवघरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे,ग्रामपंचायत सदस्य निता वाघाडे, अरुण ठाकरे, अशोक कुंभारे,महादेव वाघाडे, तावी येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप दातारकर, देविदास कुडमते,राजु परचाके, शिलाताई धारणे,वानरचुवा येथील दसरत दुधकोहळ, कवडुजी बोटरे, शैलेश बोटरे, पंचफुला पसारे, आदिसह मोहगांव, तावी, वानरचुवा येथील नागरी उपस्थित होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post