आयुष्य शिकविणारी माणसे..... मा.रामदासजी राऊतसर आयुष्य जगत असताना सर्वात वेळ जर कशात जात असेल तो निरर्थक विचार करण्यामध्ये. वेळेचा उपयोग जर आपले कर्तृत्व फुलविण्यासाठी केला तर एक परिपूर्ण , परिपक्व माणूस जो निर्माण होतो तो आदरणीय रामदासजी राऊतसर यांच्यासारखा असतो.राऊतसर हे एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले आणि अडचणीशी लढून लढून इथपर्यंत आलेले आहेत.कोणतेही मागे मोठे वजन,वशिला ,पैसा नसताना एका जिद्दीच्या जोरावर राऊतसर अनेकविध कलाकृतीचे निर्माता, दिग्दर्शक ,लेखक बनले आहेत. तृप्ती फिल्म प्रोडक्शन हे शिरूर मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्जेदार कलाकृतीची जननी म्हणून नावलौकिकास पात्र ठरणार आहे.कोणताही माणूस पुढे जाताना त्यांच्यासाठी दृश्य अदृश्य अनेक चांगल्या माणसांची साथ सोबत असते. प्रेरणा ,प्रोत्साहन देणारे धीर देणारे, शब्द कारण ठरत असतात.आदरणीय रामदासजी राऊतसर हे सतत क्रियाशील , प्रयत्नशील ,असतात.त्यांना कुटुंबाची साथ आहे.मित्रांची साथ आहे.ध्यास ,अभ्यास,चिंतन , नियमित व्यायाम यामुळे मा.राऊतसर आजही सतेज , टवटवीत चिरतरूण वाटतात.आज आणि पुढेही अनेकांचे प्रेरणास्त्रोत बनतील. आदरणीय रामदासजी राऊतसर यांच्या जीवनाचे सार एकाच वाक्यात देता येईल ते म्हणजे स्वतःपासून आदर्शतत्वांची सुरुवात करीत असतात.कामाच्या ताणतणावात धावपळीत आयुष्य हरवत जातलेखन,वाचन,व्यायाम,चांगले विचार आयुष्य घडवित जातजीवनात शिस्त असावी शिस्तीत जगण आयुष्य फुलत जातंमागे पडू नका,खचू नका विचार बदला आयुष्य सांगून जातमा.राऊतसर यांच्या आईवडिलांना हा लेख अर्पण...... राजेंद्र.डी.मोरे, बारामती

Previous Post Next Post