*राज्यस्तरीय आदिवासी लघुपट स्पर्धेत जळगावचा दिप्तेश सोनवणे प्रथम — जळगाव जिल्हा आणि टोकरे कोळी समाजाचा अभिमान*. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य आणि भगवान बिरसा कला संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आदिवासी लघुपट स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या टोकरे कोळी आदिवासी समाजातील तरुण दिप्तेश पांडुरंग सोनवणे यांनी प्रथम क्रमांक पटकवून जळगाव जिल्हा आणि टोकरे कोळी समाजाला पहिल्यांदाच हा मान मिळवून दिला आहे.दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नागपुर येथे झालेल्या भगवान बिरसा मुंडा 150 वी जयंती व जनजातीय गौरव समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिप्तेश यांना रोख रक्कम 3 लाख रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.दिप्तेश यांनी तयार केलेला “निसर्ग आणि आदिवासी” हा लघुपट आदिवासी समाजाचा निसर्गाशी असलेला अतूट संबंध आणि सहजीवन दाखवतो.या लघुपटाचे लेखन, छायाचित्रण व संकलन दिप्तेश सोनवणे यांनी केले असून दिग्दर्शन प्रदीप भोई यांनी केले आहे. कलाकार म्हणून शितल नेवे यांनी प्रभावी भूमिका साकारली आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय आदिवासी मंत्री भारती पवार व आदिवासी मंत्री अशोक उईके उपस्थित होतेराज्यभरातून आलेल्या अनेक स्पर्धकांमधून जळगावच्या दिप्तेश यांनी मिळवलेले हे यश जळगाव जिल्ह्यासाठी आणि टोकरे कोळी समाजासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.दिप्तेश यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्यस्तरीय आदिवासी लघुपट स्पर्धेत जळगावचा दिप्तेश सोनवणे प्रथम — जळगाव जिल्हा आणि टोकरे कोळी समाजाचा अभिमान*.                                                        
Previous Post Next Post