यावल नगर परिषद निवडणूक वॉर्ड क्र. ९ मधून मनिषाताई नितीन बारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल* (शुभम बारी यावल तालुका ग्रामीण प्रतिनिधी)यावल नगर परिषद निवडणुकीच्या तयारीला शहरभर उत्साहाने सुरुवात झाली असताना वॉर्ड क्रमांक ९ मध्ये राजकीय वातावरण आणखी रंगतदार झाले आहे. उमेदवार मनिषाताई नितीन बारी यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष अधिकृतपणे नामनिर्देशन अर्ज दि. १७ नोव्हेंबर २०२५ दाखल केला. समाजकार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या मनिषाताई बारी यांनी गेल्या काही वर्षांत वॉर्डातील अनेक नागरिकांशी घट्ट नातं जोडले आहे. महिलांच्या समस्या, पाणीटंचाई, स्वच्छता, दिव्यांग सहाय्य, शालेय विद्यार्थ्यांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्या अग्रेसर राहिल्या आहेत. स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या अडचणी कधीही, कोणत्याही वेळी ऐकून मदत करणे हा त्यांच्या कामाचा विशेष गुण राहिला आहे. यामुळे वॉर्डातील नागरिकांचा त्यांच्यावर चांगलाच विश्वास निर्माण झाला आहे.अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांची मोठी उपस्थिती दिसून आली. या वेळी मनिषा बारी यांनी, “वॉर्ड क्र. ९ च्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, स्वच्छता, सुरक्षितता, पाणीपुरवठा आणि रस्ते सुधारणे हे माझे प्रमुख प्राधान्य असेल,” असे सांगितल्याचे समजते.

यावल नगर परिषद निवडणूक वॉर्ड क्र. ९ मधून मनिषाताई नितीन बारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल*    
Previous Post Next Post