बार्शीटाकळी |शुक्रवार, १९, डिसेंबर*. (अकोला जिल्हा प्रतिनिधि इमरान खान)*बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या वतीने आज एक अधिकृत आदेश (फरमान) जारी करण्यात आला आहे. तहसीलदार श्री. राज वजीरे साहेब आणि नगरपंचायत प्रशासक श्री राहुल कंकाळ यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता पासून नगरपंचायत बार्शी टाकळी इथे सुरू होणार आहे.जारी आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींनी वैध ओळखपत्र (आय-कार्ड) अनिवार्यपणे सोबत आणणे आवश्यक आहे. आय-कार्डशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच, मतमोजणी स्थळी मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तहसील प्रशासनाने कडक निर्देश देत कोणताही प्रतिनिधी किंवा व्यक्ती मोबाईल फोनसह मतमोजणी कक्षात प्रवेश करू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.याशिवाय, पत्रकारांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत, सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. प्रवीण धुमाळ साहेब यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्याची तयारी सुरू केली आहे. मतमोजणी केंद्र तसेच परिसरात आवश्यक तेवढा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Previous Post Next Post