खिरोदा प्र यावल येथे१५ व्या वित्त आयोगाची निष्कृष्ठ दर्जाच्या कामाची लेखी व ऑनलाईन तक्रार करून देखील भ्रष्ठ अधिकाऱ्यांचा चौकशी करण्यासाठी कामचोरपणा.. (रावेर तालुका विभागीय उपसंपादक) ग्रा पं खिरोदा प्र यावल येथील माहे फेब्रुवारी/मार्च 2025मध्ये केलेल्या 15वा वित्त आयोग अंतर्गत केलेल्या निकृष्ट कामाची तक्रार किशोर चौधरी ग्रामपंचायत सदस्य यांनी मा. गट विकास अधिकारी, शाखा अधिकारी, व विस्तार अधिकारी यांना लेखी, फोन वरून, व व्हाट्सअप ला केलेली होती. परंतु त्याच्याकडून आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. सदर कामांची ऑनलाइन तक्रार सुद्धा झालेली होती, त्याची चौकशी सुद्धा आजपर्यंत झालेली नाही सदर गटार बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून पाण्याचा कुठलाही स्लोप तिथे काढला गेलेला नाही. गटारीचे काठ नीट ओतले गेलेले नाहीत.*गटारीवरील धापे तुटलेले आहेत, व आसारी वरती आलेली आहे* त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना व गुरांचे पाय गटारीत पडून जखमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरी संपूर्ण प्रकारणाची चौकशी रावेर पंचायत समिती यांच्याकडे होती, सदर तेथील विस्तार अधिकारी व शाखा अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता तक्रारदाराच्या अर्जस केराची टोपी दाखवली. त्यामुळे आज धाप्यावरील आसारी वरती आलेली आहे, वेळीच चौकशी करून कॉन्ट्रॅक्टरला सूचना केल्या असत्या तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती यामध्ये विस्ताराधिकारी, शाखा अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचे बोलले जात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0