वर्धा जिल्ह्यात बोगस कामगारांची पुण : चौकशी होणार आहे !_____________________खोट्या 90 दिवसांच्या प्रमाणपत्रावरवर्ध्यात धडक कारवाई ; 65 कंत्राटदाराना नोटिसा ______:::______. बांधकाम कामगारांसाठी 90 दिवसांचे खोटे व बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 65 ठेकेदार व कंत्राटदारांवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने धडक कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून काहींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.या प्रकरणात काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे लेखी निवेदन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सादर केले आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांकडून देण्यात आलेली 90 दिवसांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून उर्वरित ठेकेदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील दलाल, एजंट, कंत्राटदार व काही संघटनांचे धाबे दणाणले आहे.नियमबाह्य व प्रमाणाबाहेर काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र ज्या कामगारांना देण्यात आले आहे, त्या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत निर्गमित 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांबाबत अधिनियमाच्या कलम 1(4) नुसार, कंत्राटदाराकडे 10 पेक्षा अधिक कामगार कार्यरत असतील तर अधिनियम 7(1) व नियम 22(1) अन्वये आस्थापनेची नोंदणी बंधनकारक आहे.दरम्यान, काही 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फतही स्वतंत्र कारवाई सुरू असल्याची माहिती सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी दिली..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0