तिन दिवसात एस.आय.आर.चे काम संपवा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल.
*©} आयुक्त - नितिन नार्वेकर*
———————————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
परभणी महा नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रा मध्ये एस.आय. आरचे काम संथ गतीने होत असल्याची खंत व्यक्त करत
"परभणी महापालिका आयुक्तांचा नितिन नार्वेकर यांनी दिला कारवाईला सामोरे जाण्याचा ईशारा
मनपामध्ये आढावा बैठकीत दिला.
सविस्तर वृत्त असे की,
एसआयआरचे काम पुढील तीन ते चार दिवसात सर्व बी.एल.ओ. यांच्याकडून पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेऊन संबंधित प्रभागा मध्ये नगर सेवक लोक प्रतिनिधी यांना देखील सहभागी करून घ्या. मॅपिंगचे काम पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी देखील बी.एल.ओ.ला सहकार्य करावे. कामामध्ये कूचराई केल्याचे आढळल्यास संबंधित बी.एल.ओ. विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिला.
महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या कक्षात बुधवारी यंत्रणांची एस.आय.आर. संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजापुरे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम, सहा. आयुक्त गजानन जाधव, अल्केश देशमुख, मोहम्मद जावेद, यांच्या सह मनपा कार्यक्षेत्रातील बी.एल.ओ . आणि सुपरवायझर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
परभणी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले नाव WWW .ECI.Gov.in या संकेतस्थळावर जावून Searh your name in Caet SIR यावर click यावर क्लीक करून आपली 2002 च्या यादी मधील माहीती घेवून आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर आपल बुथवर अधिकारी यांना संपर्क करून माहीती देवून आपली आणि परिवाराची माहीती मॅपींग करावी तरी सर्वाना आवाहन करण्यात येते की, आपला व आपल्या परिवारतील सदस्याचे मॅपींग करून घेण्यात यावे.असे आवाहन मा.अति.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा आयुक्त परभणी शहर महानगर पालीका तसेच उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
या बैठकीत महागनर पालीकेचे कर्मचारी दोन बी.एल.ओ . यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान आयुक्त नितीन नार्वेकर , उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसिलदार संदीप राजापुरे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्याहस्ते करण्यात आला. यामध्ये मुजीब रहमान ९०.८१ टक्के आणि जालिंदर कांबळे यांनी ९०.६५ टक्के काम पूर्ण केले. या दोघांनी संबंधित कार्यक्षेत्रात त्यांना दिलेल्या १२५१ पैकी ११३६ घरांचा सर्वे मुजीब रहमान यांनी केला. जालिंदर कांबळे यांनी १३४८ पैकी १२२२ घरांचा मॅपिंग सर्वे पूर्ण केला. शहरातील सर्व प्रभागात उर्वरित नागरिकांनी त्यांच्या मॅपिंगचे काम पूर्ण करून घ्यावे यासाठी बीएलओ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. सर्व बी.एल.ओ. यांनी त्यांचे मॅपिंगचे प्रमाण ९० टक्केपर्यंत पूर्ण करावे, असे देखील आदेश बजावले आहेत. या कामासाठी सर्व सहाय्यक आयुक्त यांनी सुपरवायझर, बीएलओ यांना सहकार्य करावे. सुपरवायझर आणि बी.एल.ओ. यांनी सकाळी आठ ते ११.00 ते सायंकाळी ४ ते ७ यावेळी मॅपिंगचे काम घरोघरी जावून करण्यासाठी हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.
***

