हिप्परगा थडी येथे पहिल्यांदाच, राजमाता आहिल्याबाई होळकर जयंती साजरी.
डॉ. आण्णा भाऊ साठे वाचनालयाचे आदर्श उपक्रम
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड/बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती हिप्परगा थडी, येथे पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त शरीराची हेल्थ तपासणी, व बाडी चेक अप करण्यात आले. यावेळी 200 लोकांनी या शिबिरांचा लाभ घेण्यात आला, आरोग्य संजीवनी वेलनेस अँड फिटनेस सेंटर शाखा नांदेड आरोग्य सल्लागार पी जी भालेराव यांच्या ,नेतृत्वात ही तपासणी करण्यात आली .यावेळी उपस्थित गावचे पोलीस पाटील शंकराप्पा मठपती ,तुकडे सर, व तुकडे साईनाथ, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील भुरे, व इम्रान पटेल ,सद्दाम मोमीन अफजल मोमीन, अविनाश अंजनीकर, राजू एडकेवार,वाचनालयाचे सचिव राजू अंजनीकर, वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार ,वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, गंगाराम एडकेवार, संग्राम एडकेवार, व वाचनालयातील विद्यार्थी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या, यावेळी बोलत असताना वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका वाचनालयाच्या समितीतर्फे राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व महामानवांची जयंती डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अभ्यासिका व वाचनालया तर्फे आम्ही करत आहोत, व करत राहणार हिप्परगा थडी या गावांमध्ये वाचनालयाच्या माध्यमातून, प्रत्येक महामानवांना घराघरात पोहोचवण्याचं कार्य असंच करत राहणार ,असे यावेळी बोलून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले, व हिप्परगा थडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची एक 301 जयंती प्रत्येक माणसाची आरोग्य तपासणी करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

